Homeताज्या बातम्या

चापडगावात आज वाचन संस्कृतीचा दुहेरी सोहळा

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे वाचन संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने उमेद वाचनालयाच्या वतीने रविवार (दि. २१ जून) सकाळी साडेनऊ वाजता जिल्

श्रीरामपुरात रविवारी कविसंमेलनाचे आयोजन; डॉ. बाबुराव उपाध्ये अध्यक्ष तर अरुण पा. नाईक उद्घाटक
‘वृद्धेश्वर’वर आ. राजळे गटाचे वर्चस्व   दोन जागांसाठी लढत होणार ; बिनविरोध करण्यात अपयश  
बारामतीत काँग्रेसची माघार, तर राहुरीत रंगणार ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा!दिग्गजांच्या माघारीनंतर आता ७ उमेदवारांमध्ये लढत;
वाचन संस्कृतीचे जतन काळाची गरज - Katusatyanews.com :


शेवगाव : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे वाचन संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने उमेद वाचनालयाच्या वतीने रविवार (दि. २१ जून) सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘श्यामची आई वाचा आणि जिंका’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच शिक्षक-कवी गवाजी बळीद लिखित ‘दिनविशेष काव्यधारा’ या शालेय उपयुक्त काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 समारंभाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कल्याणराव नेमाणे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रचना, महाराष्ट्र राज्य एकता फाऊंडेशनचे संस्थापक अनंतराव कराड, वाचन संस्कृती श्रीरामपूरचे संस्थापक प्रा. डॉ. बाबूराव उपाध्ये, ग्रामीण युवा पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे, संत तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी हभप कृष्णा ताठे, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, तहसीलदार आकाश दहाडदे, गटविकास अधिकारी सोनल शहा, गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, मुख्याधिकारी विजया घाडगे, अधिव्याख्याते डॉ. मुकुंद दहिफळे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर, कवी चंद्रकांत कर्डक, विठ्ठल सोनवणे, शरद चाबुकस्वार, प्रशांत वाघ-येवलेकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत सायमन भारस्कर, निवृत्त अधिव्याख्याते जालिंदर बटुळे, शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे, शिक्षक नेते विलास लवांडे, केंद्रप्रमुख बबनराव ढाकणे, रघुनाथ लबडे, विष्णूपंत गायकवाड, नामदेव धायतडक, श्रीकृष्ण शेळके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 या कार्यक्रमास वाचनप्रेमी, साहित्यरसिक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच ग्रंथप्रकाशन सोहळ्यानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू किंवा सत्कार साहित्य न आणता ‘दिनविशेष काव्यधारा’ या काव्यग्रंथाची प्रत सवलतीच्या दरात खरेदी करून वाचन संस्कृती संवर्धनाच्या उपक्रमास हातभार लावावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS