Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

1 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा आयोजन

बीड प्रतिनिधी - प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यात सन 2021 ते 2024 -25 या कालावधीत राबविण्यात येत असून या मोहिमेचा भाग म्ह

देवीला प्रसन्न करण्यासाठी बापाने दिली मुलीची बळी
अहमदनगरमध्ये क्रूर पित्याने पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं
मणिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ परळीत निदर्शने

बीड प्रतिनिधी – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यात सन 2021 ते 2024 -25 या कालावधीत राबविण्यात येत असून या मोहिमेचा भाग म्हणून सन 2023 – 24 या घटक निहाय निर्धारित भौतिक व आर्थिक लक्षांक साध्य करण्यासाठी कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान साजरा करावयाचा असून ही योजना असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी राबविली जात आहे. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे प्रमाण 60.40 असे आहे.
2 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट जिल्हा संसाधन व्यक्तींना सदर अर्जाचे वाटप करून जिल्हा नोडल अधिकारी मार्फत सनियंत्रण करण्यात येणार असून सविस्तर प्रकल्प अराखडे डी पी आर करण्याकरिता जिल्हा संसाधन व्यक्ती यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा संसाधन व्यक्तींकडून सर्व लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडे डी पी आर तयार करून जिल्हा निवडला अधिकार्‍यांमार्फत विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून याबाबत सबंधित तालुका कृषी अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत सनियंत्रण करण्यात येणार आहे. जे जिल्हा संसाधन व्यक्ती वेळेत सविस्तर प्रकल्प आराखडे डीपीआर करत नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करून त्यांच्या जागी नवीन व्यक्तींच्या तातडीने सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी इच्छुक सेवा निवृत्त बँक अधिकारी प्रकल्प अराखडे तयार करण्याचा अनुभव असणारे पदवीधर यांनी जिल्हा संसाधन व्यक्ती या पदाकरिता अर्ज सादर करावेत. 14 ऑगस्ट ज्या बँकेकडे प्रकल्प अराखडे मंजुरीस्तव सादर केले आहेत त्यांचे प्रस्ताव कर्ज मंजुरी होण्याच्या दृष्टीने बँक शाखा व्यवस्थापक व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांची संयुक्त तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय एकदिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर होतील त्यांना योजनेचे क्षमता बांधणी अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण पुढील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या आयोजित ग्रामसभांमध्ये सबंधित कृषी सहाय्यक यांच्यामार्फत योजनेची माहिती व योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यची पध्दत: वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योजकांनीुुुिाषाश.ोषळि.र्सेीं या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे व गट लाभार्थींनी ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करता येतील बीज भांडवल साठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा बियाणे व्यवस्थापन कक्ष उमेद चडठङचणचएऊ यांच्याशी संपर्क साधावा तसेच अधिक माहिती व संपर्कासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

COMMENTS