Homeताज्या बातम्या

सदाभाऊ खोतांनी आंदोलनकर्त्यांना “आतंकवादी” संबोधल्यावरून वादंग; विरोधकांची टीका, बच्चू कडूंकडूनही विधान मागे घेण्याचा सल्ला

मुंबई: दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचा उल्लेख "आतंकवादी" असा केल्

‘एफ’ ग्रेड कायम असलेल्या ७ महाविद्यालयांतील पीजी प्रवेश स्थगित; २२ महाविद्यालयांना मोठा दिलासा
किनवट जवळील ’भूलजा’ गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; अडीच वर्षांच्या चिमुकलीसह दोघे गंभीर जखमी
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
Bachchu Kadu on CJP Protest : आंदोलन देशाचा आत्मा, आंदोलकांना दहशतवादी  म्हणणे चुकीचे' : बच्चू कडूंनी सदाभाऊ खोतांना सुनावले

मुंबई: दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचा उल्लेख “आतंकवादी” असा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, महायुतीतील काही नेत्यांनीही या विधानाशी असहमती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी आघाडीतील आमदार बच्चू कडू यांनीही सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावे, असा सल्ला दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत वापरलेल्या शब्दांवरून राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांचे नेते सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचा सूर अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. आंदोलने करून राजकारणात स्थान मिळवलेल्या व्यक्तींनी आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना “आतंकवादी” म्हणणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात देशभरातील लाखो विद्यार्थी आवाज उठवत आहेत. अशा विद्यार्थ्यांना “आतंकवादी” म्हणणे म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांचा अपमान आहे. सरकार एका केंद्रीय मंत्र्यांना वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना आतंकवादी संबोधणे चुकीचे – राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत टीका केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी बोलण्यापूर्वी स्वतःच्या आंदोलनांच्या काळातील भूमिका आणि भाषणे आठवावीत, असा टोला त्यांनी लगावला. शेट्टी यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांचा उल्लेख करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

COMMENTS