Homeताज्या बातम्या

संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात शालेय गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

तेलगाव रोड, बीड येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी य

अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावामानसतज्ञ व समुपदेशक मनीषा बिक्कड- घुले यांचे प्रतिपादन
अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणी काँग्रेसचा पाटोदा येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहश्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांवर कारवाईची मागणी; पोलीस ठाण्यात दिले निवेदन
शिवमय वातावरणात बीडमध्ये धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी



तेलगाव रोड, बीड येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगरसेवक दत्ताजी जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सादेकभाई पठाण, शेख एजाजभाई, युनूसभाई तांबोळी, विलास धनवडे तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी रोहन पाचंग्रे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. नगरसेवक दत्ताजी जाधव म्हणाले, आजच्या काळात शिक्षण महाग झाले असले तरी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी संत तुकाराम प्राथमिक विद्यालय उत्कृष्ट कार्य करत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर चांगले संस्कार, सामाजिक जाणीव आणि मानवतेची भावना जोपासली पाहिजे. शिक्षण हेच जीवनातील यशाचे खरे साधन आहे. सादेकभाई पठाण यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगत, शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही. शिक्षणामुळे माणसातील माणूसपण जागे होते आणि स्वतःबरोबरच समाजाचाही विकास होतो, असे प्रतिपादन केले. गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. या उपक्रमामुळे शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बबनराव आंधळे होते. त्यांनी समारोप करत सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले, तर बाबासाहेब आरकडे सर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. समाजातील विविध घटकांनी अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना पुढाकार देण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

COMMENTS