https://www.youtube.com/watch?v=vOBub_JDVag सांगलीतील विटा शहराकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील दोन ते तीन वाहनांचा अपघात झाला
सांगलीतील विटा शहराकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील दोन ते तीन वाहनांचा अपघात झाला. आंबेगावजवळ जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत वाहनांना धडक बसल्याने हा अपघात झाला.या दुर्घटनेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे, मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल केलं. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली.दरम्यान, विट्यात जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशा, झांज पथक आणि तब्बल ३० जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं.

COMMENTS