Homeताज्या बातम्या

मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ३ डबे राखीव करा; तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी थेट रेल्वेम

मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये
मध्य रेल्वेची लोकल सेवा पुन्हा खोळंबा
विनापरवाना फेरीवाल्यांवर मध्य रेल्वेकडून कारवाई
Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha  साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे.पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलचे तीन डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये ही सुविधा द्यावी, अशी मागणी आहे.सध्या मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबे केल्यास त्यांना प्रवासात मोठा दिलासा मिळू शकतो, असा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे.आता रेल्वेमंत्री या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS