Homeताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराची नितांत गरज; श्रीमती रोहिणी मसवले यांचे प्रतिपादन

चौसाळा: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानवाच्या आरोग्याच्या समस्या वाढत असून, निरोगी जीवनासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रति

३८ कोटींच्या वसुलीची साखर आयुक्तांकडे मागणी; ‘गणेश’ कारखान्याचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी
श्रीदत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; २९ जुलै रोजी मुख्य सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नीट प्रकरणावरून मुंबईत २६ जुलैला मोर्चाची हाक; विद्यार्थी-पालकांनी सहभागी होण्याचे ठाकरे बंधूंचे आवाहन
कला आणि विज्ञान महाविद्यालय, चौसाळा - कला आणि विज्ञान महाविद्यालय, चौसाळा

चौसाळा: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानवाच्या आरोग्याच्या समस्या वाढत असून, निरोगी जीवनासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल श्रीमती रोहिणी मसवले यांनी केले.

कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथील गृहशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पौष्टिक आहार जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पदव्युत्तर संचालक प्रा. डॉ. सुधाकर वनवे होते.

यावेळी श्रीमती मसवले म्हणाल्या की, बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यासाठी संतुलित व पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सय्यद शाहीन यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. अरुणा नावेकर यांनी करून दिला. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुधाकर वनवे म्हणाले की, पौष्टिक आहारामुळे शरीरासोबतच मनही निरोगी राहते. मन स्थिर असणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा गिराम यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS