Homeताज्या बातम्यादेश

मोहालीत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

चंदीगड : पंजाब मधील मोहाली येथे चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.शनिवारी संध्याकाळी मोहाली येथे एक चार मजली इमारत कोसळली आणि

उरणमधील गव्हाण फाटा येथील गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
राष्ट्रीय सहकार धोरण आणि सरकारमुळे विकास प्रक्रियेत अधिक गतिमानता ः विवेक कोल्हे
जामखेड-आष्टी रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार

चंदीगड : पंजाब मधील मोहाली येथे चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.शनिवारी संध्याकाळी मोहाली येथे एक चार मजली इमारत कोसळली आणि ढिगार्‍याखाली किमान पाच जण अडकले होते. त्यातील वाचवण्यात आलेल्या हिमाचल प्रदेशातील एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तसेच ढिगार्‍यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यांनतर रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढून 2 वर पोहचला आहे.

दोषींवर कारवाई करणार:मुख्यमंत्री भगवंत मान
या घटनेवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, मोहालीच्या साहिबजादा अजित सिंह नगरमधील सोहानाजवळ एक बहुमजली इमारत कोसळल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. संपूर्ण प्रशासन आणि इतर बचाव पथके घटनास्थळी तैनात आहेत. मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. त्यांनी ’एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही प्रार्थना करतो की कोणतीही जीवितहानी होऊ नये, आम्ही दोषींवर देखील कारवाई करू. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मी जनतेला करतो.

COMMENTS