Homeताज्या बातम्या

राहाता व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणाला प्रशासकीय मान्यता; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचा होणार कायापालट

राहाता: शहरातील व्यापारी सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, राहाता नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी म

पीएमएफएमई योजनेतून महिला बचत गटांना उद्योगाचे बळ; प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रांचे वाटप: सभापती आरती बनसोडे
फूल देत दिला निर्वाणीचा इशारा; आता अतिक्रमण केल्यास थेट कायदेशीर कारवाई!
भेंडवळची घट मांडणी: यंदा कापूस अन् ज्वारीला सोन्याचे दिवस; तर राजा कायम राहील मात्र तणावात
Zunjhar News - राहाता शहराच्या विकासाला आणखी चालना; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास व उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता ...

राहाता: शहरातील व्यापारी सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, राहाता नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास तसेच उर्वरित विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामामुळे व्यापारी संकुलाचे रूपडे बदलण्यास मदत होणार असून, व्यापारी व नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

याबाबत माहिती देताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून राहाता शहराच्या सर्वांगीण विकासाला सातत्याने गती मिळत असून, शहराच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्याने मंजुरी मिळवून दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संकुलाच्या नूतनीकरणास व प्रलंबित विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राहाता नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून ही प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. सदर कामांतर्गत व्यापारी संकुलातील आवश्यक दुरुस्ती, नूतनीकरण तसेच उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज व आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच संकुलात येणाऱ्या नागरिकांनाही चांगल्या सुविधा मिळणार असून, शहराच्या व्यापारी विकासाला नवी चालना मिळेल.

प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने लवकरात लवकर पुढील टेंडर व तांत्रिक कार्यवाहीला गती देण्यात येणार असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या कामामुळे राहाता शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, व्यापारी संकुलाचा हा विकास शहराच्या आर्थिक व व्यावसायिक प्रगतीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

COMMENTS