Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आयपीएल २०२६ च्या वेळापत्रकात अचानक बदल

https://www.youtube.com/watch?v=WoH1xupKSDk भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल 2026 च्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. अहमद

भारतीय खेळाडूंची आता होणार DNA चाचणी; AFI चा मोठा निर्णय
ऐतिहासिक! वैशाली रमेशबाबूने रचला इतिहास; फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय महिला!
खाशाबा जाधवांना पद्मविभूषण देण्याबाबत निर्णय घ्या; कोल्हापूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल 2026 च्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. अहमदाबादमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील दोन सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली आहे.

26 एप्रिल 2026 चा सामना पूर्वी हा सामना अहमदाबादमध्ये होणार होता, परंतु आता तो चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. हा दुपारचा सामना असून दुपारी 03:30 वाजता सुरू होईल. तर चेन्नईत होणारा सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल.
नेमकं कारण काय तर , 26 एप्रिल 2026 रोजी अहमदाबाद आणि गुजरातच्या इतर भागांत महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
याच दरम्यान , आयपीएल 2026 चे वीस सामने खेळले गेले आहेत. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत चार सामने खेळून ते सर्व जिंकले असून आठ गुण मिळवले आहेत. पंजाब किंग्स चारपैकी तीन सामने जिंकून सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर चारपैकी तीन सामने जिंकून सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्याकडे सध्या प्रत्येकी चार गुण आहेत. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी चारपैकी प्रत्येकी फक्त एकच सामना जिंकला आहे. या तिन्ही संघांकडे प्रत्येकी दोन गुण आहेत. कोलकाता नाइट रायडर्स तळाशी असून, त्यांनी अद्याप एकही सामना जिंकलेला नाही.

COMMENTS