Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकरांचे विचार कृतीतून आचारण्याची वेळ : कोल्हे

कोरपगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीयांना

भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगिकारावा-आ.केराम
माहूर शहरातील शासकीय निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
महात्मा फुलेंचे विचार देशाला पुढे नेणारे – माजी आ. तांबे

कोरपगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीयांना सर्वधर्मसमभावाचा अधिकार दिल्यामुळे देशात शांतता, सलोखा आणि प्रगतीचा मार्ग कायम राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण करणे आवश्यक आहे ,ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले आहे.
 कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.या प्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नूतन इमारतीत कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने १० तासांचे स्टडी मॅरेथॉन सत्र आणि भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन युवानेते विवेक  कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आणि शिक्षण सभापती संजनाताई संजय उदावंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जि.प. प्राथमिक शाळा, मुर्शतपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पा काळे यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान हस्तलिखित प्रत लेखन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी संवाद साधत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
 या प्रसंगी नगरध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गट नेते प्रसाद आढाव,डी.आर काले, दिलीप दारूणकर,रवींद्रअण्णा पाठक, राजेंद्र सोनवणे,संजय उदावंत,अमोल अजमेरे,संतोष शिंदे, दत्तात्रय पगारे, विक्रमादित्य सातभाई, योगेश बागुल,फिरोज पठाण,स्वप्नील मंजुळ,संदीप देवकर,अतुलशेठ काले,विनोद राक्षे, रवींद्र कथले,वैभव गिरमे, अविनाश पाठक,मयूर गायकवाड,सोमनाथ म्हस्के आदींसह कोपरगाव शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS