Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतिभा चाकणकर यांची शिर्डीत आठ तास चौकशीकोट्यवधींच्या व्यवहारांवर संशय ;आरोप फेटाळले

Here are suitable tags (without hashtags): शिर्डी :  नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचा आणि मुलगा चिन्मय याचाही जबाब नोंदवण्यात आला. समता संस्थेमध्ये आपल्या नावावर असलेले खाते हे बनावट असून आपण त्यावर एक रुपयांचा व्यवहारदेखील केला नाही, त्यातील सर्व सह्या बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केला. चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, संबंधित खाती बनावट आहेत. हे खाते मी उघडलं नाही, त्यावरच्या सह्या देखील माझ्या नाहीत. आम्ही एकही रुपयाची उलाढाल केलेली नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. तसंच, देवदर्शनाच्या नावाखाली अशोक खरातने कागदपत्रं घेतली आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा वापर करून खाती उघडली असावीत, असा आरोपही त्यांनी केला.नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे. प्रतिभा चाकणकर सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे चार खाती आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर मुलाच्या नावे दोन खाती असून, त्यातून 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. प्रतिभा चाकणकरांच्या संबंधित खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव आहे. आठ  तासांची चौकशी  शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी (१३ एप्रिल) तब्बल आठ तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान चाकणकर आणि त्यांचा मुलगा चिन्मय या दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन आणि त्यांचा मुलगा चिन्मय याच्या नावावर दोन अशी एकूण चार संशयास्पद खाती आढळून आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खात्यांवर भोंदू अशोक खरात याला वारसदार म्हणून दाखवण्यात आले होते. या चारही खात्यांमधून आतापर्यंत २ कोटी ४० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोप फेटाळले पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या जबाबात त्यांनी स्पष्ट केले की, समता पतसंस्थेतील ती खाती त्यांनी स्वतः उघडलेली नाहीत आणि या खात्यांमधून त्यांनी कधीही कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. कल्पना खरात हिने ‘देवदर्शनासाठी लागतात’ असे सांगून त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे घेतली होती. व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या याच कागदपत्रांचा गैरवापर करून अशोक खरातने बनावट स्वाक्षरीद्वारे खाती उघडल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagar : पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल | LOKNews24
अकोलेत ‘फुलोकी होली’ समारंभ उत्साहात
महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे : ऋतुजा गायकवाड

Here are suitable tags (without hashtags):

शिर्डी :  नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचा आणि मुलगा चिन्मय याचाही जबाब नोंदवण्यात आला. समता संस्थेमध्ये आपल्या नावावर असलेले खाते हे बनावट असून आपण त्यावर एक रुपयांचा व्यवहारदेखील केला नाही, त्यातील सर्व सह्या बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केला. चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, संबंधित खाती बनावट आहेत. हे खाते मी उघडलं नाही, त्यावरच्या सह्या देखील माझ्या नाहीत. आम्ही एकही रुपयाची उलाढाल केलेली नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. तसंच, देवदर्शनाच्या नावाखाली अशोक खरातने कागदपत्रं घेतली आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा वापर करून खाती उघडली असावीत, असा आरोपही त्यांनी केला.नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे. प्रतिभा चाकणकर सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे चार खाती आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर मुलाच्या नावे दोन खाती असून, त्यातून 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. प्रतिभा चाकणकरांच्या संबंधित खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव आहे.

आठ  तासांची चौकशी 

शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी (१३ एप्रिल) तब्बल आठ तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान चाकणकर आणि त्यांचा मुलगा चिन्मय या दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन आणि त्यांचा मुलगा चिन्मय याच्या नावावर दोन अशी एकूण चार संशयास्पद खाती आढळून आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खात्यांवर भोंदू अशोक खरात याला वारसदार म्हणून दाखवण्यात आले होते. या चारही खात्यांमधून आतापर्यंत २ कोटी ४० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोप फेटाळले

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या जबाबात त्यांनी स्पष्ट केले की, समता पतसंस्थेतील ती खाती त्यांनी स्वतः उघडलेली नाहीत आणि या खात्यांमधून त्यांनी कधीही कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. कल्पना खरात हिने ‘देवदर्शनासाठी लागतात’ असे सांगून त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे घेतली होती. व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या याच कागदपत्रांचा गैरवापर करून अशोक खरातने बनावट स्वाक्षरीद्वारे खाती उघडल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS