Homeताज्या बातम्या

प्रवेशद्वार कमानीवरून वाद; चौघांचे माहूर तहसीलसमोर आमरण उपोषण

माहूर: माहूर तालुक्यातील मौजे लिंबायत (मालवाडा हद्द) येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-अलगत उभारण्यात आलेल्या ’वीर शिरोमणी महाराणा प्रताप प्रवेशद्

रिपाई कार्यालयात नगर परिषद कर्मचारी आकाश धनवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांची विशेष उपस्थिती
कात्रजमध्ये १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या; ४ आरोपींना अटक करून भरपावसात काढली धिंड
राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी गदारोळ; मल्लिकार्जुन खरगे यांच्या मनुस्मृती उल्लेखावरून खडाजंगी
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचा १५ आॅगस्टला उपोषणाचा इशारा...!

माहूर: माहूर तालुक्यातील मौजे लिंबायत (मालवाडा हद्द) येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-अलगत उभारण्यात आलेल्या ’वीर शिरोमणी महाराणा प्रताप प्रवेशद्वार’ या कमानीवरून वाद निर्माण झाला आहे. सदर कमान अधिकृत परवानगीने उभारण्यात आली आहे की नाही, याची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, या मागणीसाठी चार जणांनी 4 ऑगस्टपासून माहूर तहसील कार्यालयासमोर भर पावसात आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रवेशद्वाराचे लोकार्पण दोन दिवसांपूर्वी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर कमानीच्या उभारणीसंदर्भात तसेच त्यावरील नावाबाबत आक्षेप घेत उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कमान गावाकडे जाणार्‍या जिल्हा परिषद रस्त्याच्या हद्दीत विनापरवानगी उभारण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या 2 मार्च 2014 च्या कथित ठरावाचा आधार घेण्यात आला असला, तरी अशा ठरावाची ग्रामपंचायतीच्या अभिलेखात नोंद नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी किंवा संबंधित विभागाची आवश्यक परवानगीही घेण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांनी कमानीवरील नावात बदल करण्याचीही मागणी केली आहे. कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आणि श्री विश्वकर्मा प्रवेशद्वार असा उल्लेख करावा किंवा ग्रामपंचायत लिंबायत सहर्ष स्वागत करीत आहे असा सर्वसमावेशक मजकूर लिहावा, अशी त्यांची मागणी आहे. प्रशासनाला हा विषय वादग्रस्त वाटत असल्यास कमान अनधिकृत असल्यास ती हटवून शासनाची जागा मोकळी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसंदर्भात प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करत प्रवीण भीमराव बरडे, विजय सुदाम जाधव, राहुल गौतम बेंगाळे आणि गजानन किसन मोरे (रा. लिंबायत, ता. माहूर) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. गावातील काही नागरिकांकडून महापुरुषांबाबत दुजाभाव होत असल्याची भावना व्यक्त करत उपोषणकर्त्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी तहसील प्रशासन, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS