Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड

केज :स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड येथे 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्य

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले
डॉ. आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना जपा : माजी मंत्री थोरात
भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छता अभियान

केज :
स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड येथे 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्यान, परिसंवाद, ग्रंथवाचन आदी कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले. व्याख्यान देताना महात्मा ज्योतिबा फुले हे समग्र क्रांतीचे प्रणेते होते असे प्रतिपादन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य, डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. परिसंवादात शिवतेज गायकवाड, शिवराज जाधव, आनंद गायकवाड, रविंद्र गायकवाड ( पेंटर ), नानासाहेब जाधव, अजिंक्य तट यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. तर ग्रंथवाचन वेदिका गायकवाड, कल्याणी घोगले, शिवम गायकवाड, शिवराज भोगजकर, यशराज भोगजकर, कृष्णराजे गायकवाड, यांनी सहभागी होवून ग्रंथवाचन केले. अध्यक्षीय समारोप डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. मोठ्या संख्येने वाचक, हितचिंतक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

COMMENTS