Homeताज्या बातम्याबीड

बंजारा ब्रिगेडच्या जातेगाव (जांभळी तांडा) येथे शाखा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

बंजारा, भटक्या-विमुक्त समाजाच्या मान, सन्मान, न्याय, हक्क व अधिकारांसाठी कार्यरत असलेल्या बंजारा ब्रिगेडच्या शाखेचे अनावरण गेवराई तालुक्यातील जां

संपाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा – आ. सत्यजित तांबे
वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे झारखंडमधून जेरबंद
 मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 75 रुग्णांनी घेतला लाभ



बंजारा, भटक्या-विमुक्त समाजाच्या मान, सन्मान, न्याय, हक्क व अधिकारांसाठी कार्यरत असलेल्या बंजारा ब्रिगेडच्या शाखेचे अनावरण गेवराई तालुक्यातील जांभळी तांडा (जातेगाव) येथे दि. 17 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला बंजारा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष रवीकांत भाऊ राठोड, प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ पवार, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर पवार, बीड जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पवार यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जांभळी तांडा परिसरातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सचिव प्रमोद राठोड, तालुका अध्यक्ष अमोल भाऊ राठोड तसेच स्थानिक शाखा कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकार्‍यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समाज संघटन अधिक मजबूत करण्याचे आणि समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

COMMENTS