Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंगेवाडीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन  

शेवगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्राम

महापुरुषांना जातीत अडकवू नका : शहाजी डोके
बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन
महात्मा बसवेश्‍वर यांची ’अक्षय’ विचारधारा सर्वात प्रभावी : डॉ. उपाध्ये

शेवगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामविकास अधिकारी दिलीप संजय मिसाळ यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
 यानंतर उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. वक्त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे देशाला प्राप्त झालेली समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये अधोरेखित केली. तसेच त्यांच्या विचारांचा अवलंब करून समाजातील अन्याय, भेदभाव आणि विषमता दूर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रभारी सरपंच फरीदा चाँद शेख, ग्रामपंचायत सदस्य अतिश राजू अंगरख, रंजना तानवडे, मंगल जाधव, परविन शेख, संगीता जायभाये, शैलेश गर्कळ, संजय तानवडे, रवींद्र नागरे, रमेश सुधाकर अंगरख, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भागवत मुंढे, चेअरमन उद्धव वाघ, अनिल तानवडे, सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चांद कादर शेख, सामाजिक कार्यकर्ते युसूफ शेख, किरण वाघ, सुभाष मुंढे, निवृत्ती मुंढे, भाऊसाहेब जायभाये, अण्णासाहेब जाधव, सचिन जाधव, गंगाराम जाधव, गोकुळ मुंढे, ह.भ.प. अनिल मुंढे, शरद शेलार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS