Homeताज्या बातम्या

सहस्रकुंड विकासाला गती: कॅप्टन आशिष दामले यांचा पुढाकार, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या नेतृत्वाखाली कामाला वेग

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास, 15 फूट उंच भगवान परशुराम यांच्या भव्य मूर्ती

जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बाफना यांची निवड; अहिल्यानगरमधून कौतुकाचा वर्षाव
परळी वैजनाथ बस स्थानक परिसर चिखलमय; आषाढी एकादशीच्या काळात प्रवासी व भाविक हैराण
नागापूर (खुर्द) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी साक्षरता व विधी सेवा शिबिर संपन्न
आशिष दामलेंना मंत्रिपदाचा दर्जा

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास, 15 फूट उंच भगवान परशुराम यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक शासकीय परवानग्या आणि विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जाचे कॅप्टन आशिष दामले यांनी जिल्हाधिकारी नांदेड व किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्याकडे स्वतंत्र पत्रांद्वारे केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सन 1982 च्या महापुरात वाहून गेलेल्या भगवान परशुराम यांच्या मूर्तीची तब्बल 44 वर्षांनंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, सहस्रकुंड मंदिर समितीचे सचिव सतीश वाळकीकर, स्थानिक ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते व ब्राह्मण समाजाच्या संयुक्त प्रयत्नांतून पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सहस्रकुंड तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पैनगंगा नदीवरील धबधबा, परशुराम टेकडी, गोमुख तीर्थ, सीतामाईची नान्ही आणि बाणगंगा महादेव मंदिर यांमुळे सहस्रकुंड हे धार्मिक श्रद्धा आणि निसर्ग पर्यटनाचा सुंदर संगम मानले जाते. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे येत असल्याने 15 फूट उंच भगवान परशुराम यांच्या भव्य मूर्तीची अधिकृत प्रतिष्ठापना, परिसराचे सौंदर्यीकरण आणि मूलभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक असल्याचे कॅप्टन दामले यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले आहे. यासाठी नियमानुसार आवश्यक सर्व शासकीय परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तातडीने देण्याबरोबरच जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) अथवा आमदार स्थानिक विकास निधीतून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहस्रकुंड मंदिर समितीचे सचिव सतीश वाळकीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी धार्मिक व पर्यटन विकास प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पत्रातून स्पष्ट होते.

COMMENTS