प्रदूषणाची वाढती पातळी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

प्रदूषणाची वाढती पातळी

कोरोनामुळे बर्‍याच देशात लॉकडाऊन करण्यात आले होते, यामुळे कोरोना संक्रमणांचा वेग खंडित करता येईल. परंतु गेल्या काही दिवसांत मुंबई, दिल्लीसह विविध शहर

न्यायालयीन सक्रियता
राजकीय निवाडा..
विषारी दारुचे बळी

कोरोनामुळे बर्‍याच देशात लॉकडाऊन करण्यात आले होते, यामुळे कोरोना संक्रमणांचा वेग खंडित करता येईल. परंतु गेल्या काही दिवसांत मुंबई, दिल्लीसह विविध शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. ही हवेची गुणवत्ता अशीच खालावत राहिली तर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला देशात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. नुकतेच काही दिवसांपूर्वी दिल्लीतील प्रदूषण मोठया प्रमाणांवर वाढल्यामुळे दिल्लीत दोन दिवस लॉकडाऊन का करू नये, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली होती. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाबाबत आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नुसताच विचार करून भागणार नाही, तर त्या दृष्टीने उपाययोजना देखील कराव्या लागणार आहेत. ज्या देशांमध्ये हवेची गुणवत्ता सर्वात खराब आहे, अशा देशांच्या क्रमवारीत बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतातील पार्टिक्युलेटेड मॅटर अर्थात हवेतील कण प्रदुषणाचे 2.5 केंद्रीकरण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक हवेविषयीच्या गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वापेक्षा 5.2 पट अधिक आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक डॅशबोर्डनुसार, भारत 192 हवा गुणवत्ता निर्देशांकासह खराब पातळीवर आहे आणि हवा प्रदुषणाचे प्रमाण लक्षात घेता, 97 देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात हवेची गुणवत्ता अशीच राहिली तर भारतियांचे आयुर्मान देखील कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतामध्ये आजमितीस सर्वात जास्त सक्षम मनुष्यबळ आहे. 20 ते 45 वर्ष वयोगटातील तरुणांची मोठी संख्या भारतामध्ये असल्यामुळे आपण या प्रशिक्षित मनुष्यबळाच्या जोरावर विकासाचा मोठा ठप्पा गाठू शकतो. मात्र जर हवेतील प्रदूषण असेच राहिले, तर भारतीयांचे आयुर्मान कमी होऊन याचा विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच अशा वातावरणात मनुष्याने जीवन जगायचे कसे हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो. हे तत्कालीन हवा गुणवत्ता निर्देशांकाचे स्तर आहेत आणि ते वाढत आहेत, ज्याचा परिणाम दिवाळीनंतर दिसून येतो.2019 साली, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत फटाके, कापणीनंतरचा पेंढा जाळणे आणि इतर कारणांमुळे हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर घसरल्याचे दिसून आले होते- पर्यावरण प्रदुषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिक रणाने अथवा ‘इपीसीए’ने तेव्हा सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणी घोषित केली. हवेतील प्रदुषणाने श्‍वसनाच्या समस्या निर्माण होऊन मुलांना सर्वाधिक फटका बसला; अशा प्रदुषित हवेच्या वाढत्या संपर्कामुळे मुलांना दमा आणि ब्रा ँकायटिसचा धोका वाढतो. ऐन दिवाळीमध्ये राजधानीतील हवेची गुणवत्ता खालावली होती. यावर भाष्य करतांना नागरिकांनी आता घरात देखील मास्क लावून बसावे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी केला होता. दिल्ली शहरातील 20 ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या पुढे गेल्याची नोंद झाली होती. हवेच्या शुद्धतेबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा दर्जाचे काही टप्पे तयार केले आहेत. यात शून्य ते 50 हा हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे ‘चांगला’ दर्जा मानला जातो. 51 ते 100 दरम्यान ‘समाधानकारक’ 101 ते 200 दरम्यान ‘मध्यम’ 200 ते 300 दरम्यान ‘खराब’ 301 ते 400 दरम्यान ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 दरम्यान ‘गंभीर’ दर्जा मानला जातो. ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील हवेचा दर्जा खालावल्याची नोंद झाली होती. तो 298 एवढा नोंद झाला होता. त्यामुळे हवेचा दर्जा असाच खालावत राहिल्यास भविष्यासाठी ही धोक्याची घंटा असून, यावर आतापासूनच गांभीर्याने घेत कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हवेतील वाढत्या प्रदुषणामुळे आणि 2050 पर्यंत पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर दुप्पट होण्याच्या प्रतिकूल अंदाजामुळे, सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक शाश्‍वत विकास उद्दिष्टांविषयक प्रगती साधण्याकरता हवेतील प्रदुषण कमी करणेही महत्त्वाचे आहे.

COMMENTS