मुंबई: 'लॉकअप 2' नंतर आणखी एका रिअॅलिटी शोचा द एंड झाला आहे. प्राइम व्हिडीओचा शो 'द अलायंस' या सिझन 1 चा फिनाले पार पडला आहे. या शोचा पहिला व्हिन
मुंबई: ‘लॉकअप 2’ नंतर आणखी एका रिअॅलिटी शोचा द एंड झाला आहे. प्राइम व्हिडीओचा शो ‘द अलायंस’ या सिझन 1 चा फिनाले पार पडला आहे. या शोचा पहिला व्हिनर या शोने आपल्या फिनालेमध्ये घोषित केला आहे. अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट मिनी माथूर हिनं शोची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये रोख बक्षीस जिंकलं आहे. मिनीनं अंतिम फेरित अली गोनी आणि रुही दोसानी यांचा पराभव केला आहे. सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘द अलायंस’ या रिअॅलिटी शोचा फिनाले गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्राइम व्हिडीओवर स्ट्रिम झाला आहे. टॉप 3 मध्ये जागा तयार करण्यासाठी कुशल टंडनची संधी हुकली. फिनाले 3 स्पर्धकांमध्ये पार पडला. गोनी, रुही आणि मिनी यांच्यात फिनाले पार पडला. तगडी कॉम्पिटेशन असूनही, मिनीने ‘द अलायंस’साठी स्वत:चं बेस्ट दिलं. ती शोमधील फायनल Ace बनली होती. तशीच ‘द अलायंस’ची व्हिनरही ठरली. सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फॅन्स आणि खास तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इंटरनेटवर नेटकरीही डिझर्व्हिंग व्हिनर असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक टास्कमध्ये मिनीने स्वत:ला सिद्ध केलं आहे. तिनं स्मार्ट पद्धतीने गेम्स खेळून चाहत्यांची मने देखील जिंकली आहेत. ‘द अलायंस’ या शोमध्ये मिनी आणि निखिल चिनप्पा यांची मैत्री प्रचंड गाजली. दोघांनी प्रत्येक टप्प्यात एकमेकांची साथ दिली. पण तिची ‘द अलायंस’ मधील जर्नी काही सोपी नव्हती. मिनी माथुरची विशेष ओळख प्रसिद्ध होस्ट म्हणून होती. पहिल्यांदाच तिने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तिने याआधी ‘झलक दिखला जा 2’मध्येही भाग घेतला होता. मिनीने आतापर्यंत अनेक इंडियन आयडलचे सिझन होस्ट केले आहेत.

COMMENTS