Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.आंबेडकरांचे संविधान सर्व ग्रंथापेक्षा श्रेष्ठ : पालकमंत्री विखे

राहाता : महापुरुषांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्या महापुरुषांमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अग्रेसर असून डॉ.आंबेडकरां

जामखेडमध्ये नर्सची स्वतःच इंजेक्शन लाऊन आत्महत्या   
शिवाजी ओहोळ यांचे निधन
वादळग्रस्त नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : आ. काळे

राहाता : महापुरुषांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्या महापुरुषांमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अग्रेसर असून डॉ.आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक,शैक्षणिक व इतर सर्व कार्याला उजाळा देण्याचा हा आजचा दिवस आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हा सर्व ग्रंथापेक्षा सर्वात अधिक पवित्र ग्रंथ असल्याचे  जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
राहाता येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे वतीने जयंती व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम प्रसंगी विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेशचे माजी अध्यक्ष मुकुंद सदाफळ तसेच  नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉ.विजय सदाफळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र निकाळे, उपाध्यक्ष प्रदीप बनसोडे, ऍड.रघुनाथ बोठे आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून डॉ. विखे पाटील यांनी पूजन केले. राहाता येथील भनते मोगलायन संघ यांनी प्रार्थना म्हटली.
 विखे पाटील म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हा सर्व ग्रंथापेक्षा सर्वात अधिक पवित्र ग्रंथ असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान ने समाजातील चांगले काम करणाऱ्या नवरत्नांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान केल्याच्या बद्दल त्यांनी राजेंद्र निकाळे,प्रदीप बनसोडे व प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
 याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर,पंकज पिपाडा, सुनील सदाफळ,प्रा बाळासाहेब गाडेकर ,माधव बिडवे, बाळासाहेब गिधाड, हाजी बालमभाई सय्यद, दत्तात्रय पिलगर यांना समाजभूषण पुरस्कार तसेच माजी सैनिक भानुदास गाडेकर यांना प्रेरणादायी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

COMMENTS