Homeताज्या बातम्या

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची कुक्कडगाव येथे ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

बीड : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त कुक्कडगाव (ता. बीड) येथे रविवारी (दि. ३१ मे २०२६) विविध कार्यक्रमांचे आयो

प्रा. डॉ. शेख अतिक लतीफ यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘आदर्श आरोग्यदूत जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर
पहाडी पारगाव ग्रामस्थांच्या वतीने ज्योती अंडील हिचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न
लक्ष्मीच्या पावलांनी झाला शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाचा शुभारंभ

बीड : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त कुक्कडगाव (ता. बीड) येथे रविवारी (दि. ३१ मे २०२६) विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील जिजाऊ चौक, माऊली नगर चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या तीन प्रमुख ठिकाणी ध्वजारोहण करून राजमातांच्या लोकोत्तर कार्याला अभिवादन करण्यात आले.

या सोहळ्यासाठी कुक्कडगावसह चव्हाणवाडी, खुंड्रस व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या समाजहितैषी, लोककल्याणकारी आणि आदर्श शासन व्यवस्थेच्या विचारांचे स्मरण करत, समाजात एकता व सेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या जयंती कार्यक्रमास यशवंतभाऊ कदम, कॅप्टन राजाभाऊ आठवले, दादासाहेब गांडगे, आत्माराम प्रभाळे, चंद्रकांत नवले, डॉ. मयूर कदम यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थित सर्व नागरिकांनी राजमातांच्या आदर्शांचा आणि लोककल्याणकारी कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

COMMENTS