राणा दाम्पत्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणा दाम्पत्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला

जामीन अर्जावर 29 एप्रिल रेाजी होणार सुनावणी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्याकरिता मुंबईत दाखल झालेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा

शेतपाणंद रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेला नाही
लाल कांद्याच्या खरेदीसाठी हस्तक्षेप करा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्याकरिता मुंबईत दाखल झालेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याला फटकारल्यानंतर त्यांनी मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र मंगळवारी देखील त्यांचा जामीन होऊ शकलेला नाही, त्यामुळे राणे दाम्पत्याला शुक्रवारपर्यंत न्यायालयात राहावे लागणार आहे.
राणा दाम्पत्याकडून मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दाम्पत्याचे वकील अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 29 एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडतील आणि त्यानंतर 29 एप्रिलला जामिन अर्जावर सुनावणी होईल. याआधी वांद्रे न्यायालयातील जामीन अर्ज मागे घ्यावा लागेल तरच सत्र न्यायालयात सुनावणी होईल. दरम्यान आम्ही वांद्रे न्यायालयातील अर्ज मागे घेत आहेत असे राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 29 एप्रिलपर्यंत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कारागृहातच रहावे लागणार असल्याचे दिसत आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (25 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. दोन वेगळ्या घटना असल्यामुळे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. मात्र दुस-या एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं आवश्यक आहे, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. तर 353 गुन्ह्यात राणा दाम्पत्यांना दिलासा मिळाला आहे. एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं गरजेचं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणी करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती. न्यायमुर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमुर्तींनी राणा दाम्पत्यांची चांगलीच कानउघडणी केली.

नवनीत राणांनी केली लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
राज्य सरकारला 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आ. रवी राणा यांना महाराष्ट्र सरकारने विविध कलमांखाली अटक केलीय. ही अटक बेकायदेशीर असून कारागृहात वाईट वागणूक मिळत असल्याची तक्रार खा. राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केलीय. या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाने 24 तासात राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेय. नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर 23 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. यावेळी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले नाही. तसेच वॉशरुमला देखील जाऊ दिले नाही. खा. राणा मागासवर्गीय असल्याने पोलीस कर्मचार्‍यानं आपल्याला पाणी देण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप राणा यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केला.

COMMENTS