पुणे : हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीच्या फेज-३ परिसरात गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संयुक्त मॉक ड्रिलचे आ

पुणे : हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीच्या फेज-३ परिसरात गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संयुक्त मॉक ड्रिलचे आयोजन केले. संभाव्य दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांचा समन्वय आणि प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी हा सराव करण्यात आला. या सरावात एनएसजी, मुंबईच्या २६ स्पेशल कॉम्पोझिट ग्रुपचे अधिकारी व कमांडो सहभागी झाले होते. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कमांडोंनी परिसरात प्रवेश करून दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे प्रात्यक्षिक सादर केले.

COMMENTS