Homeताज्या बातम्या

अतिक अहमदच्या मुलाचा अपघातात मृत्यू

प्रयागराज : कुख्यात गुन्हेगार अतिक अहमद याचा धाकटा मुलगा अबान अहमद (वय २१) याचा गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. झाशी कारा

उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव!
थांबलेल्या लालपरीवर भरधाव कार धडकली, कारचा चेंदामेंदा
कर्जतमधील अपघातात तिघांचा मृत्यू
Atiq Ahmed’s Youngest Son Abaan Dies In Jhansi Road Accident, Conflicting  Accounts Emerge Over Crash

प्रयागराज : कुख्यात गुन्हेगार अतिक अहमद याचा धाकटा मुलगा अबान अहमद (वय २१) याचा गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. झाशी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी तो मित्रांसह निघाला असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत त्याचा मित्र सोनू याचाही मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबान प्रयागराजहून झाशीकडे मोटारीने प्रवास करत होता. वाहनात एकूण पाच जण होते. झाशी-कानपूर महामार्गावरील पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक एक प्राणी वाहनासमोर आल्याने चालकाने वाहन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी वाहनावरील ताबा सुटून मोटार दुभाजकावर जाऊन जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की मोटारीचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर वाहनातील पाचही जण आत अडकून पडले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनाचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अबान अहमद आणि त्याचा मित्र सोनू यांना मृत घोषित केले. उमर अहमद, मोहम्मद जैद आणि असलम हे तिघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

COMMENTS