Homeताज्या बातम्या

नेकनूरमध्ये पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम तरुणांचा पुढाकार; मोफत टँकरद्वारे नागरिकांना दिलासा

नेकनूर : जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नेकनूर गावात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. १७ सदस्यांची ग्रामपं

शिक्षकाची नोकरी व्यवसाय नसून पवित्र व्रत; नुजहत सय्यद यांच्या कार्याचा आदर्श सर्व शिक्षकांनी घ्यावा – सलीमखान पठाण
स्व. विलासराव देशमुख जनतेप्रती बांधिलकी जपणारे नेते; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे प्रतिपादन
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती आंदोलन

नेकनूर : जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नेकनूर गावात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. १७ सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या या गावासाठी आतापर्यंत सुमारे २४ कोटींहून अधिक रुपयांच्या दोन मोठ्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या, मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही गावकऱ्यांच्या नळाला अद्याप नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

यापूर्वी गावात सुमारे ५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत १९ कोटी ५५ लाख रुपयांची नवीन योजना मंजूर करण्यात आली. भंडारवाडी येथील जलस्रोतावरून गावाला पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

या तीव्र उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईची दखल घेत गावातील सामाजिक भान असलेल्या तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ‘एआयएमआयएम’ (AIMIM) च्या बॅनरखाली कोणत्याही शासकीय मदतीशिवाय, स्वतःच्या खर्चातून गावात मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. जात, धर्म, पक्ष किंवा गटभेद न करता प्रत्येक नागरिकाला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या तरुणांकडून होत असल्याने गावभर त्यांचे कौतुक होत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. एआयएमआयएमच्या टँकरमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी शासनाने जलजीवन मिशनच्या कामांची सखोल चौकशी करून गावाला नियमित पाणी द्यावे, अशी मागणी नेकनूरकरांनी केली आहे.

COMMENTS