नगर अर्बन बँकेत पैसे जमा करू नका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेत पैसे जमा करू नका

दीप चव्हाण यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेवरील आर्थिक निर्बंध जोपर्यंत शिथील होत नाहीत, तोपर्यंत महापालिकेने या बँकेत रकमा जमा करु नये. या बँकेतील सर्व खाती

डॉ. लोंढे, चव्हाण व गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
नाटेगावच्या सरपंचपदी जयवंत मोरे
रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेवरील आर्थिक निर्बंध जोपर्यंत शिथील होत नाहीत, तोपर्यंत महापालिकेने या बँकेत रकमा जमा करु नये. या बँकेतील सर्व खाती तातडीने इतर बँकेत वर्ग करुन कर्मचार्‍यांची आर्थिक संकटातून मुक्तता करावी तसेच मनपामार्फत पुरवठादार व ठेकेदार यांच्या रकमाही वर्ग करु नये, अशी मागणी माजी महापौर दीप चव्हाण यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात चव्हाण यांनी नमूद केले आहे, नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दि. 6/12/2021 रोजी आर्थिक निर्बंध लागू केले असून खातेदाराला खात्यातून सहा महिन्यात फक्त रु. 10 हजार काढता येणार आहेत. यामुळे एक प्रकारे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. महापालिकेतील सेवानिवृत्त 133 कर्मचार्‍यांचे पेन्शन खाते व कार्यरत कर्मचार्‍यांचे पगाराचे खाते या बँकेत असून महापालिकेने या बँकेतील खात्यावर पेन्शन व वेतनाची रक्कम जमा केल्यास कर्मचार्‍यांना फक्त दहा हजार रुपयेच आर्थिक निर्बंधामुळे मिळणार आहेत. त्यामुळे महापालिकेने बँकेत रक्कम जमा करुनही केवळ आर्थिक निर्बंधामुळे पगार व पेन्शन न मिळाल्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असा दावा चव्हाण यांनी केला असून, या बँकेतील मनपाची व सर्व खाती तातडीने इतर बँकेत वर्ग करुन कर्मचार्‍यांची आर्थिक संकटातून मुक्तता करावी, अशी मागणी केली आहे.

COMMENTS