Homeताज्या बातम्या

इराण-अमेरिका तणावामुळे भारतावर महागाईचे सावट; होर्मुज खाडीनंतर दुसरा सागरी मार्गही ठप्प, तेल पुरवठा विस्कळीत

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमालीचा वाढला असून त्याचा थेट फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. सलग ११ व्या दिवशी अमेरिकेन

महेश दीक्षित आयबीचे (IB) नवे संचालक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जि. प. शाळेची इमारत दुरवस्थेत; स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमालीचा वाढला असून त्याचा थेट फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. सलग ११ व्या दिवशी अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केल्याने दोन्ही देशांतील संघर्ष विकोपाला गेला आहे. या युद्धामुळे महत्त्वाचा ‘होर्मुज खाडी’ मार्ग पूर्णपणे बंद झाला असून आता हूती बंडखोरांच्या धमक्यांमुळे दुसरा महत्त्वाचा सागरी मार्गही ठप्प झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक महागल्याने भारतात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनल्याने या मार्गावरून होणारी जहाजांची वाहतूक थांबली आहे. त्यातच येमेनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी भारत आणि चीनच्या दिशेने येणाऱ्या तेलवाहू जहाजांना थेट धमक्या दिल्या आहेत. सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराहून कच्चे तेल घेऊन निघालेली दोन जहाजे (ज्यातील एक भारताकडे व दुसरे चीनकडे जात होते) हूती बंडखोरांच्या धमकीमुळे अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरली आहेत. ही जहाजे आता सुएझ कालव्याच्या दिशेने वळवावी लागली आहेत.

बाब अल-मंदिब मार्गावर हूती बंडखोरांचा धोका वाढल्याने जहाजांना मोठा वेढा घालून प्रवास करावा लागत आहे. लांबच्या मार्गामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढला असून कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या केवळ तांबडा समुद्र आणि यान्बू पाईपलाईन हेच मार्ग उपलब्ध राहिले आहेत.

होर्मुज खाडी तात्काळ सुरू होण्याचे कोणतेही संकेत नसून, तेलाची वाहतूक महागल्यामुळे भारताला याचा थेट फटका बसत आहे. युद्ध जर असेच लांबले तर इंधनाचे दर वाढून देशात महागाईचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

COMMENTS