मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ’शाम-ए-रफी’

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ’शाम-ए-रफी’ या प्रतिष्ठित गायन स्पर्धेत श्री. एम. डी. सय्यद यांनी आपल्या प्रभावी, सुरेल आणि भावपूर्ण गायनाने उपस्थित रसिक व परीक्षकांची मने जिंकत ’उत्कृष्ट गायक’ हा मानाचा पुरस्कार पटकाविला.
ही स्पर्धा एसवायएनए (सिना) प्रॉडक्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन श्री. सलीम शेख यांनी केले असून, हा संगीत सोहळा २७ जुलै २०२६ रोजी गोरेगाव (मुंबई) येथील सर्वे स्टुडिओ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्पर्धेत मुंबईसह विविध भागांतील अनेक गुणवान गायकांनी सहभाग नोंदवून मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गीतांचे सादरीकरण केले.
या स्पर्धेत श्री. एम. डी. सय्यद यांनी आपल्या सुरेल आवाज, अचूक स्वर, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासपूर्ण मंच सादरीकरणाच्या जोरावर विशेष छाप पाडली. त्यांच्या सादरीकरणास परीक्षकांकडून तसेच उपस्थित संगीतप्रेमींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना ’उत्कृष्ट गायक’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान त्यांच्या सातत्यपूर्ण संगीत साधनेची आणि मेहनतीची पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उल्लेखनीय यशाबद्दल संगीत क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि संगीतप्रेमींनी श्री. एम. डी. सय्यद यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS