धर्माने कोणतेही राष्ट्र महासत्ता होणे नाही !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

धर्माने कोणतेही राष्ट्र महासत्ता होणे नाही !

धर्माने कोणतेही राष्ट्र महासत्ता होणे नाही !

(भाग -१) भारत हा एक देश म्हणून सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर प्रथमच उभा राहिला तो ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे १९४७ पासून. तत्पूर्वी

भीषण अपघात…दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी | LOKNews24
डॉ. गणेश चव्हाण पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर
लातूरची एसटी सुसाट; ’मे’ महिन्यात 2 कोटींचा नफा !

(भाग -१) भारत हा एक देश म्हणून सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर प्रथमच उभा राहिला तो ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे १९४७ पासून. तत्पूर्वी  संस्थानिक, खोती, अशा प्रकारच्या हुकूमी राज्यव्यवस्था ठिकठिकाणी अस्तित्वात होत्या. संविधान निर्माणानंतर या सर्वप्रकारच्या संस्थांनांना खालसा करून देश किमान भौगोलिकदृष्ट्या एकसंघ बनवला गेला. यात स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्र निर्माणात आपले योगदान देणाऱ्या सर्वच राष्ट्रीय पुरूषांचे योगदान राहिले. यात गांधी-नेहरू-पटेल-आंबेडकर-बोस ही यादी फार मोठी आहे. या कर्तबगार राष्ट्रपुरूषांनी आकाराला आणलेला हा देश स्वातंत्र्योत्तर काळात नेहमीच एकसंघ राहिला आहे. बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक आयाम असणारा हा देश चीन, पाकिस्तान या देशांबरोबर झालेल्या युद्धकाळातही मजबूत राहीला. या देशातील जनता मग ती कोणत्याही धर्माची, प्रांताची,जातीची असो ती एकजूट राहीली आहे. याचे मुख्य कारण भारतीय समाज बहुजिनसी असल्याने त्याला हे माहित आहे, की, सर्वच संस्कृतींना येथे समान वाव आहे. स्वातंत्र्य आणि समतेच्या तत्वद्वयी मुल्यांनी वावरत असणारा भारतीय समाज आपसात बंधुताही जपतो. मात्र, या मूल्यांना चिरडत केवळ एका वर्णाचे स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी या देशातील हिंदू समाजाला बहकावण्याचे कार्य धार्मिकतेच्या नावाखाली काही संघटना करू पाहतात. येत्या १२ ते १८ जून दरम्यान हिंदू जनजागरण  ” अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन” गोव्यात भरविले जात आहे. या अधिवेशनाच्या नावातच ” हिंदू राष्ट्र ” ही संकल्पना वापरली गेली आहे. या संकल्पनेचा उहापोह करतांना त्यांनी भारत हिंदू राष्ट्र बनल्याशिवाय महासत्ता बनणार नाही, असा एक हास्यास्पद युक्तीवाद केला आहे. आजपर्यंत जगात दोनच राष्ट्र महासत्ता म्हणून उदयास आल्या. त्यातील पहिले अमेरिका! ज्या अमेरिकेने युरोपच्या धर्तीवर धर्मचिकित्सा करित थेट  पोप सारख्या धर्मप्रमुखांना आवाहन दिले. धर्माला राजकीय सत्तेत कोणत्याही हस्तक्षेपापासून त्यांनी रोखले आणि विज्ञान – तंत्रज्ञानात प्रचंड संशोधन करित दुसऱ्या महायुध्दानंतर ते महासत्ता म्हणून उदयास आले तर आजतागायत कायम आहेत. दुसऱ्या बाजूला रशियाचा उदय देखील नाझींचा पाडाव करून महासत्ता म्हणून झाला. १९१७ मध्येच त्यांनी धर्मसत्तेला नाकारले होते. १९९१ च्या विघटनानंतर सोवियत युनियन कोसळले. परंतु, त्यानंतर ती जागा आता चीन घेऊ पाहतेय. ज्या चीनने धर्मसत्तेची चिकित्सा करित विज्ञान – तंत्रज्ञानाची कास धरली. हे सांगण्याचे कारण एवढेच, की, भारत हिंदू राष्ट्र बनल्याशिवाय महासत्ता बनू शकत नाही, हा जो युक्तिवाद हिंदू जनजागरण समितीने केला आहे, तो हास्यास्पद आहे, हे यातून दिसते. धर्माधिष्ठित होऊन जगातील कोणताही देश महासत्ता बनलेला नाही, हे खरे वास्तव आहे.        वास्तविक, हिंदू ही जीवनपध्दती आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हटले आहे. भारतात जन्मलेला माणूस हा हिंदू आहेच, हे आमचे सांपत्तिक व वारसा कायद्यातून देखील स्पष्ट होते. हिंदू, शीख, जैन, बौध्द आदी सर्व धर्म वारसा कायदृयानुसार हिंदू आहेतच. मग, अशी कोणती बाब आहे की, ज्यासाठी हिंदू राष्ट्राचा घोष केला जातोय, असा प्रश्न केला तर त्यांच्या भूमिकेतच याचे उत्तर सापडते. ते हिंदू ची व्याख्या करताना मेरूतंत्र चा संदर्भ देतात. हिन गुणांचा नाश करतो तो हिंदू, अशी ते व्याख्या करतात. वास्तविक मेरूतंत्र हे रघुनाथ शास्त्री द्वारा लिखित एक तंत्र मंत्र ग्रंथ आहे. एकूण ३५ प्रकाश भागात असणाऱ्या या ग्रंथात एकूण ८२१ अध्याय आहेत. ज्याची मुळ भूमिका ही ब्राह्मण श्रेष्ठत्वाची आहे. ज्याच्या १३६ व्या श्लोकात म्हटले की, मनुचे श्रेष्ठत्व स्थापन करण्याचे महान कार्य करणे हे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे विष्णूदेव देवांमध्ये श्रेष्ठ, नद्यांमध्ये हिमालयाच्या उच्चतमतेवरून उगम पावलेली गंगा नदी श्रेष्ठ, वृक्षांमध्ये अश्वत्थ: श्रेष्ठ तसे सर्व वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ अशी तात्विक भूमिका असलेल्या मेरूतंत्र चा आदर्श असणारी समिती ही हिंदूची नसून ब्राह्मण श्रेष्ठत्वाचे कार्य करणारीच आहे, हे स्पष्ट होते.

COMMENTS