Homeताज्या बातम्या

शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी कपिले

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;algolist: 0;multi-frame: 1;brp_mask:0;brp_del_th:null;brp_del_sen:null;motionR

पिंपळनेरच्या भीमज्योत बुद्ध विहारात ‘बुद्ध प्रबोधन’ सोहळा उत्साहात
सालाना बरसीनिमित्त नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप : हजारो भाविक झाले सहभागी
जंतर-मंतर युवा आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
motionR: 0;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 253.7132;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?Rain, icon:6, weatherInfo:100;temperature: 33;zeissColor: bright;

कोपरगाव शहर : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेनुसार सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून पक्षाचे विचार आणि लोककल्याणकारी योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात कोपरगाव येथील एकनिष्ठ शिवसैनिक ज्ञानेश वसंतराव कपिले यांची शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि. ८) मुंबई येथील बाळासाहेब भवनात उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख मयूर मगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोशल मीडिया राज्य उपप्रमुख प्रतिक शर्मा आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन ज्ञानेश कपिले यांची जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली.

ज्ञानेश कपिले हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी विद्यार्थी सेनेचे उपशहर प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कोपरगाव तालुकाप्रमुख, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख आदी शिवसेना पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. या काळात त्यांनी अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असून, युवकांचे संघटन उभारण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, कोपरगाव शहरप्रमुख अक्षय जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

COMMENTS