Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड शहरातील नागसेन बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा 13 एप्रिल रोजी

बीड :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करत मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे जा

उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी समाज आक्रमक; ३० जूनला मुंबईत विधानसभेला घालणार घेराव
आंधळ्या श्रद्धेच्या कैदेतील सशक्तपणा…
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच

बीड :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करत मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे जाहीर केले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या बौद्ध धम्माची दीक्षा घेत देशभर बौद्ध धम्माचा प्रसार करण्याचा संकल्प केला.
या पार्श्वभूमीवर, बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने सोमवार, दि. 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता नागसेन बुद्ध विहार, पालवण चौक, बीड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास पुज्य भिक्खु डॉ. इंदवंस्स महाथेरो (छ. संभाजीनगर), पुज्य भिक्खु धम्मशील थेरो (महाविहार धम्मभूमी शिवणी), पुज्य भिक्खु अश्वजित (छ. संभाजीनगर), पुज्य भिक्खु पंय्यावर्धन (हिंगोली), पुज्य भिक्खु सुमेधबोधी (छ. संभाजीनगर) तसेच पुज्य भद्रेय (छ. संभाजीनगर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमास बीड शहरातील सर्व उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS