करू साजरे सण हरवून कोरोनाला

Homeताज्या बातम्यासंपादकीय

करू साजरे सण हरवून कोरोनाला

नकोच प्रादुर्भाव नव्याने‌           जपूया जीवाला सारे       &nbs

बलात्काराच्या आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळले | LOK News 24
मार्केट यार्ड चौकात कोरोनारुपी रावणाचे दहन
चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर अभिषेक बच्चनने मारला झणझणीत मिसळावर ताव

नकोच प्रादुर्भाव नव्याने
‌           जपूया जीवाला सारे
           नांदावे सुखसमृद्धी पुन्हा
           घुमावेत आनंदाचे वारे
                कोरोनामुळे गेल्या वर्षी एकही सण साजरा करता आला नाही. एवढेच नाही तर घरातून बाहेरही पडता आले नाही. मुलांच्या शाळा बंद. काही लोक वगळता बऱ्याच जणांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावे लागले. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नव्हता. यावर्षी कोरोनाने आपला पाश थोडा कमी केला आहे. त्याच बरोबर ७० टक्के जनसंखेचे लसीकरण झाले असल्याने संसर्गाची भीती कमी झाली आहे. मुलांच्या शाळाही सुरळीत चालू झाल्या आहेत. तरीही तोंडावर मास्क लावून आणि सोशल डिस्टंसिंग पाळत सर्वांनी काळजी घेऊनच सण साजरे करावेत असे शासनाने आवाहन केले आहे. यंदा नेहमीप्रमाणे नाही तरीही बऱ्यापैकी बाजारपेठा दिवाळीच्या साहित्याने फुलल्या आहेत.
          चला लुटुया आनंद
           आला दिवाळीचा सण
         ‌  दिवे पणत्यांच्या प्रकाशात
           जपूया माणुसकीचे क्षण
             कोरोना महामारीच्या  फटक्याने बेरोजगारीमुळे दारिद्र्यात वाढ झाली आहे आणि महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे खरेदीसाठी थोडी मंदी आली आहे. जो तो आपापल्या परीने थोडीबहुत खरेदी करत आहे. ऑनलाईन शॉपिंगचे प्रस्थ वाढले आहे. त्यातून मिळणारे डिस्काउंट लोकांना योग्य वाटतात.
            शिवाय सोशल डिस्टंसिंग पाळत  घरी बसून शॉपिंग करता येत असल्याने तरुणाईचा ऑनलाइन शॉपिंगकडेच जास्त कल असतो. व्हाट्सअप वरून वारंवार चीनच्या वस्तू वापरू नका, स्वदेशी वस्तू खरेदी करा असे मेसेजेस फिरत असतात. बाजाराच्या कोपर्‍यात ढीगभर पणत्या घेऊन बसलेली एखादी वृद्धा दिसताच लोक तिच्याकडून खरेदी करताना दिसतात. एकूणच बाजार खरेदीदारांसाठी खुला झाला असला तरी लोकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. कित्येक घरातून कोरोनामुळे मृत्यू झाले असल्याने ते दुखवटा पाळत आहेत. काम धाम नसल्याने जमा केलेली पुंजी घरात बसून संपवावी लागल्याने बरीच कुटुंबे खरेदीपासून दूर आहेत. कारण काहीही  असो या वर्षी दिवाळी साजरी होत आहे हाच आनंद आहे. प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करण्याची लोकांच्यात सजगता आली आहे. त्यामुळे विनाप्रदूषित दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके  खरेदी न करण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येते. ज्यामुळे हवेचे प्रदूषण होते, ध्वनिप्रदूषण होते. आत्ताच खूप मोठे संकट संपत असताना पुनरावृत्ती होऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे.  कोरोनाने बुद्धिजीवी लोकांच्या बुद्धीला चॅलेंज केले आहे. गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुष, लहान-मोठा, उच्च-नीच ही दरी कमी झाली आहे. एकमेकांना सहकार्य करण्याची भावना बळावत आहे. त्यामुळे गणपती, दसऱ्या पाठोपाठ येणारी दिवाळी पण साजरी करण्याकडे लोकांचा कल आहे. हल्ली मुलेही हट्टीपणा कमी करू लागले आहेत. कितीतरी कुटुंबांनी कर्ता पुरुष गमावल्याने जीवनाचा रस संपल्याप्रमाणे झाले आहे.
         पावसाने बऱ्याच ठिकाणी धिंगाणा घातल्याने पिके भुईसपाट झाली होती. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. सुगी बरोबर न मिळाल्याने खर्चावर आपोआपच नियंत्रण आले आहे. सरकार दरबारी मदत मिळण्याचे ही नामोनिशाण नाही त्यामुळे अंथरूण पाहून पाय पसरण्याचे ठरवत मनुष्यप्राणी या वर्षी दिवाळी साजरी करणार आहे. घरी बसून राहिल्याने व्यायामाचा अभाव जाणवतो. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. स्थुलपणा वाढल्याने दिवाळीचा फराळ  कमी बनवण्याकडे गृहिणींचा कल दिसून येतो. व्यायाम न करता घरीच बसून राहिल्यामुळे बऱ्याच लोकांना हृदय विकार आणि उच्च रक्तदाबाचे विकार जडले आहेत. त्यामुळे तेलकट-तुपकट पदार्थ वर्ज्य होत आहेत .
           लावूया पळवून कोरोनाला
           देऊया सारे मदतीचा हात
           एकमेकांच्या सहकार्यानेच
           करू या संकटावरती मात
                 दीड वर्ष घरातच बंदिस्तपणे बसून काढल्याने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मुले घरातच बसून दूरदर्शन आणि मोबाईलवरील गेम खेळणे पसंत करू लागली आहेत. काही मुलांचा अभ्यासक्रम  बदलला, बुडला असल्याने त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुले मैदानी खेळ पूर्ण विसरले आहेत. कोरोनाच्या धक्क्यातुन मानव अजून सावरायचा आहे. हळूहळू सावरेल, तोवर गरज आहे संयमाची आणि धीराची! लहान मुले थोडे थोडे धाडस करू लागले आहेत. घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. एकमेकाला आधार देत मनुष्य फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उडू लागला आहे. सगे सोयरे गमावल्याचे दुःख विसरून एकमेकांना सहकार्याचा हात देत आहे. एकमेकांच्या हातात मदतीचा हात देऊन घोळ्यामेळ्याने, आनंदाने सर्वांनी दिवाळीचा सण साजरा करू. एकमेकाला शुभेच्छा देऊ. पर्यावरणाची काळजी घेऊ आणि कोरोनाचा पुन्हा संशोधन होणार नाही यासाठी खबरदारी घेऊ.
        आपल्याला देशाची प्रगती करायची आहे. पुढची पिढी घडवायची आहे. आधीच त्यांची ज्ञानोपासनेची दोन वर्षे वाया गेली आहेत. त्यांना ज्ञान संवर्धनासाठी हातभार लावायचा आहे. आईबाप गमावलेल्या चिमुकल्यांना सावरायचे आहे. आपण पोरके नाही हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. गरिबांना आपल्या पूंजीतील थोडीशी रक्कम देऊन दारिद्र्यरेषेच्यावर आणायचे आहे. आपल्याला माणुसकीचे नाते जपायचे आहे.
             वागू या माणसासारखे
             जपू माणुसकीची नाती
             एक हात मदतीचा देऊन
             मिळवू मानवजातीत ख्याती

भारती सावंत, मुंबई
9653445835

COMMENTS