Homeताज्या बातम्या

एफडीएची थेट बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड; प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मचा परवानाही निलंबित! तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. याच

शेतकर्‍यांनी तातडीने केवायसी पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा; नेकनूरचे उपसरपंच सचिन शिंदे यांचे आवाहन
ट्रम्प यांचा डोक्यावरचा हात उठताच रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला! एकापाठोपाठ २७ मिसाईल डागल्या, युक्रेनचा काळ्या समुद्रात पलटवार
घुले प्रकरण: घटनेदिवशी मी अन् गाडीही घरीच! सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळले, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. याचदरम्यान एफडीएच्या पथकाने थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये धाड टाकून ते सील केले आहे. दररोज ७ ते ८ हजारांपेक्षा अधिक लोक जेवणाऱ्या या कॅन्टीनवर कारवाई झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना आता स्वतःचा डबा सोबत ठेवावा लागणार आहे.

यापूर्वी स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले होते. यानंतर आता मरीन लाइन्स परिसरातील १९१६ मध्ये स्थापन झालेल्या ११० वर्षे जुन्या ऐतिहासिक ‘पारसी डेअरी फार्म’वरही एफडीएने बुधवारी कारवाई करत स्वच्छतेच्या त्रुटींमुळे संस्थेचा परवाना निलंबित केला आहे.

तक्रारीसाठी तुकाराम मुंढेंनी सुरू केले AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल

कुठेही भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे आढळल्यास नागरिकांना तक्रार करणे अधिक सोपे व्हावे यासाठी महाराष्ट्र एफडीएने AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल सुरू केले आहे. याबाबत माहिती देताना तुकाराम मुंढे म्हणाले, “नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे हाच सुशासनाचा उद्देश आहे. आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत फक्त बोलून आपली तक्रार नोंदवू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ती तक्रार आपोआप तयार करून संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवेल.”

या प्रणालीमध्ये तक्रारीचा निपटारा होण्यास विलंब झाल्यास ‘स्वयंचलित एस्कलेशन’ होईल आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येईल. “प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे,” असे सांगत तुकाराम मुंढेंनी नागरिकांना या AI व्यासपीठाचा वापर करून अन्न भेसळीविरोधात पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS