Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलने सलग दहाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली भक्कम छाप कायम ठेवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून तब्बल ५० टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  या उज्ज्वल यशामागे शाळेच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांचे प्रेरणादायी नेतृत्व, प्राचार्य समीर अत्तार यांचे अचूक नियोजन तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.   संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, ‘हे यश केवळ गुणांचे नसून विद्यार्थ्यांच्या परिश्रम, शिस्त आणि जिद्दीचे प्रतीक आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक ठरेल, याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे सांगितले. दहा वर्षांच्या सातत्यपूर्ण वाटचालीत शाळेने केवळ निकालांपुरते मर्यादित न राहता सक्षम, जागरूक आणि ध्येयवेडे विद्यार्थी घडवले असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाने अभिनंदनाचा वर्षाव केला असून परिसरातही या निकालाचे कौतुक होत आहे. गुणवंत विद्यार्थी समता इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई इयत्ता दहावी परीक्षेत आर्या दीपिका राहुल सांड हिने ९९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. राजेश्वरी सुरेखा चैतन्य तांबे हिने ९८ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवताना सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. दृष्टी पुनम खुशाल ठाकूर हिने ९७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

डॉ. भावना धन्वे यांचा सत्कार
महावितरणचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ शेख अखिल उस्मान यांनाकर्तव्यनिष्ठ सेवेमुळे लातूर परिमंडळाकडून गौरव; माजलगांवात आनंदाचे वातावरण
राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कुरुमकर  

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलने सलग दहाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली भक्कम छाप कायम ठेवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून तब्बल ५० टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 या उज्ज्वल यशामागे शाळेच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांचे प्रेरणादायी नेतृत्व, प्राचार्य समीर अत्तार यांचे अचूक नियोजन तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. 

 संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, ‘हे यश केवळ गुणांचे नसून विद्यार्थ्यांच्या परिश्रम, शिस्त आणि जिद्दीचे प्रतीक आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक ठरेल, याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे सांगितले. दहा वर्षांच्या सातत्यपूर्ण वाटचालीत शाळेने केवळ निकालांपुरते मर्यादित न राहता सक्षम, जागरूक आणि ध्येयवेडे विद्यार्थी घडवले असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाने अभिनंदनाचा वर्षाव केला असून परिसरातही या निकालाचे कौतुक होत आहे.

गुणवंत विद्यार्थी

समता इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई इयत्ता दहावी परीक्षेत आर्या दीपिका राहुल सांड हिने ९९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. राजेश्वरी सुरेखा चैतन्य तांबे हिने ९८ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवताना सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. दृष्टी पुनम खुशाल ठाकूर हिने ९७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

COMMENTS