माजलगांव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) लातूर परिमंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ यंदा माज

माजलगांव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) लातूर परिमंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ यंदा माजलगांव उपविभागातील शहर शाखा क्र. 2 येथे कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ शेख अखिल उस्मान यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
शेख अखिल उस्मान यांनी आपल्या सेवाकाळात वीज वितरण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. दुर्गम भागातही अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी वेळेची पर्वा न करता मेहनत घेतली. तांत्रिक अडचणींवर तात्काळ मात करत ग्राहकांना तत्पर व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना ते कर्तव्यनिष्ठ, जबाबदार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी असल्याचे नमूद केले. अनेक आव्हानात्मक परिस्थितींमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत विभागाची प्रतिमा उंचावण्यास मोलाचा वाटा उचलला आहे. लातूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. बुलबुले तसेच उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. चुनारकर यांच्या हस्ते शेख अखिल उस्मान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल माजलगांव उपविभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS