Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कुरुमकर  

श्रीगोंदा :  तालुक्याचे सुपुत्र, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या नंदकुमार कुरुमकर यांची राज्य शिक्षकेतर महास

डॉ. भावना धन्वे यांचा सत्कार
वेदमूर्ती परीक्षेत आदित्य कुलकर्णी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
शुभम थोरातला एमबीबीएस पदवी  


श्रीगोंदा :  तालुक्याचे सुपुत्र, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या नंदकुमार कुरुमकर यांची राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष वाल्मीकजी सुरासे यांनी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून, कुरुमकर यांच्या दीर्घकाळाच्या निष्ठावान कार्याची ही दखल मानली जात आहे.
श्री कुरुमकर यांनी गेल्या तब्बल 38 वर्षांपासून महासंघात सक्रिय योगदान देत संघटनेला बळकटी दिली आहे. 1992 पासून ते संघटनेशी जोडले गेले असून, अध्यक्ष वाल्मीक सुरासे तसेच माजी अध्यक्ष एस. डी. डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रामाणिकपणे काम करत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज बनण्याची भूमिका निभावली आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.  त्यांच्या प्रयत्नांतून अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे संघटनेतून सांगण्यात आले.
कुरुमकर हे 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमावेळीच राज्याध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखपदाच्या निवडीची घोषणा केली.  
या निवडीमुळे राज्य शिक्षकेतर महासंघाला अधिक बळ मिळणार असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाला ठोसपणे भूमिका घ्यावी लागेल, असा विश्वास राज्याध्यक्ष सुरासे यांनी व्यक्त केला.
 या निवडीबद्दल राज्य कार्याध्यक्ष केशव पाटील, राज्य सचिव पाराजी मोरे, माजी अध्यक्ष एस. डी. डोंगरे, मार्गदर्शक समशेर पठाण, राजू पठाण, परशुराम वेताळ, अविनाश चढगुलवार, भाऊसाहेब धनवटे, सतीश बडदे, अशोक आळेकर, तौसिफ शेख, सदाशिव काटेकर, राजकुमार चैनानी, सुनील म्हस्के, किशोर जामदार आदींनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS