Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. भावना धन्वे यांचा सत्कार

बीड : लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन येथून एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या प्राप्त केल्याबद्दल डॉ. भावना बाळू धन्वे यां

अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी
शिक्षक नेते सुभाष वीर यांची कन्या डॉ. साक्षीचे एमबीबीएसमध्ये घवघवीत यश
राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कुरुमकर  

बीड : लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन येथून एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या प्राप्त केल्याबद्दल डॉ. भावना बाळू धन्वे यांचा त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. भावना धन्वे यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल नातेवाईक व आप्तेष्टांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी उषा बाळू धन्वे, संपादक उत्तम ओव्हाळ, प्रतिक्षा उत्तम ओव्हाळ, उत्तम रावसाहेब धन्वे, अनिल रावसाहेब धन्वे, चंद्रसेन रावसाहेब धन्वे, सिद्धेश्वर गौतम धन्वे, प्रीतम आत्माराम धन्वे, रोहन सखाराम धन्वे, प्रतीक उत्तम धन्वे, अक्षय सुनील धन्वे, निषाद बापूराव धन्वे, सौरभ चंद्रशेखर धन्वे, विनोद गौतम धन्वे, प्रदीप आत्माराम धन्वे आदी उपस्थित होते. सर्वांनी डॉ. भावना धन्वे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या.

COMMENTS