Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर अवकाळी पावसाचे सावटपुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात पुढील तीन ते चार दिवस हवामानाचा लहरी स्वभाव कायम राहणार असून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा बुधवारी हवामान

दरडगाव थडी येथे 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
नागपूर शहरात आढळला स्फोटकांचा साठा
वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण

मुंबई : राज्यात पुढील तीन ते चार दिवस हवामानाचा लहरी स्वभाव कायम राहणार असून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा बुधवारी हवामान विभागाने दिला आहे. अचानक बदलणार्‍या या वातावरणामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली असून दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते. वार्‍याचा वेग वाढण्याची चिन्हे दिसत असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही भागांत गारपीट होऊ शकते. या भागांत वार्‍याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. कोकणातही ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भातही अवकाळीचा प्रभाव जाणवणार असून अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून वार्‍याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास राहू शकतो. दरम्यान, धुळे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने मोठा फटका बसला आहे. सुमारे आठ हजाराहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून हजारो शेतकरी बाधित झाले आहेत. कांदा, मका, उन्हाळी बाजरी, भाजीपाला तसेच पपई, डाळिंब आणि आंब्याच्या मोहरालाही मोठा फटका बसला आहे.

COMMENTS