नांदेड: महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य
नांदेड: महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक सेनेने दिली. बैठकीत 29 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार शिविअ., केंद्रप्रमुख आणि पदोन्नत मुख्याध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शिक्षण विभागाला दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच मदनूरकर उपस्थित होते. तसेच शिक्षकांच्या प्रलंबित जीपीएफ स्लीप पुढील दोन दिवसांत सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली. याशिवाय आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करणे तसेच शाळांचे वीजबिल 15 व्या वित्त आयोगातून अदा करण्याच्या मागण्याही प्रशासनाकडे मांडण्यात आल्या. जीपीएफ स्लीपचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल शिक्षक सेनेने वित्त विभागाचे अभिनंदन केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष विठ्ठूभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस रवि बंडेवार, जिल्हा कोषाध्यक्ष गंगाधर कदम यांच्यासह जिल्हा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धार शिक्षक सेनेने व्यक्त केला.

COMMENTS