Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या

पुणे ः पती सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने तसेच वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ करुन लग्नाचा झालेला 15 लाख रुपयांचा खर्च मागणी करत असल्याचे

प्रियकरासोबतच्या भांडणानंतर ट्रेनी अग्निवीर महिलेची आत्महत्या
हॉटेल एक्सप्रेस इन इथल्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
पैशासाठी त्रास दिल्याने एकाची आत्महत्या : दोघांविरूध्द गुन्हा

पुणे ः पती सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने तसेच वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ करुन लग्नाचा झालेला 15 लाख रुपयांचा खर्च मागणी करत असल्याचे त्रासाला कंटाळून 29 वर्षीय विवाहितेने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच प्रकार घडला आहे. प्रियंका विनायक पाटील (वय-29) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रियंकाचे वडील तुकाराम खंडु कदम (वय-66,रा.कॅम्प,पुणे) यांनी तिचे पती विनायक अनंतराव पाटील (39) व नणंद वनिता मोरे (रा.कराड) यांचे विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका व विनायक यांचा जुलै 2014 मध्ये थाटामाटात विवाह पार पडला होता. त्यानंतर ती सासरी नांदत असताना, पती तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करत होता. तसेच तिला शिवीगाळ करुन लग्नाचा झालेला 15 लाख रुपयांचा खर्च दे असे म्हणून छळ करत होता. तसेच तिची नणंद ही तिचा छळ करत असल्याने त्याला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस कदम करत आहे.

COMMENTS