बिहार विधानसभा अध्यक्ष-मुख्यमंत्री खडाजंगी सांस्कृतिक विरोधाभास!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

बिहार विधानसभा अध्यक्ष-मुख्यमंत्री खडाजंगी सांस्कृतिक विरोधाभास!

   बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे समाजवादी विचारांचे नेते असले तरी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या पक्षाची भाजपशी भाजपशी युती असल्याने भाजप आणि

कसबे सुकेणे शिवारात बिबट्या जेरबंद
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
राज्यात भारनियमनचा शॉक | DAINIK LOKMNTHAN

   बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे समाजवादी विचारांचे नेते असले तरी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या पक्षाची भाजपशी भाजपशी युती असल्याने भाजप आणि त्यांचा समाजवादी पक्ष हे किमान समान कार्यक्रमाने सत्ता चालवीत आहेत. मात्र बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांची आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची विधानसभेमध्ये थेट खडाजंगी पाहायला मिळाली. या खडाजंगी मागे मुळात हा विचारधारेचा प्रश्न दिसत असल्याचे जाणकारांना स्पष्ट दिसून येते. विजय कुमार सिन्हा हे मुळतः आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पूर्वापार कुटुंबा पासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याने ते स्वतः लखीसराय या त्यांच्या खास करून नातेवाईकांच्या जिल्ह्याचे ते दुर्गापूजा समितीचे आधीपासूनच प्रमुख राहिले आहेत. या ठिकाणी आर एस एस च्या माध्यमातून ते अनेक कार्यक्रम राबविले जात असले तरी, दुर्गापूजा हा त्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो. मात्र याच कार्यक्रमाच्या दरम्यान बिहार मध्ये काही प्रमाणात हिंसाचार झाला आणि त्याच्यामध्ये 9 लोक ठार झाल्याचे प्रकरण हे बिहार विधानसभेमध्ये अनेक दिवसांपासून गाजत होते. परंतु या विषयावर पोलीस आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यातच टक्के सर येथे बाचाबाची झालेली असल्याने पोलिसांनी दिलेला अहवाल हा मंत्रालयाकडे सुपूर्द केला जातो. त्यामुळे पोलिसांच्या अहवालावर सरकार एक चौकशी समिती नेमेल आणि त्या चौकशी समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करेल असे, मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयानंतरही विधानसभेमध्ये लखीसराई च्या मुद्द्यावर खडाजंगी किंवा वादग्रस्त चर्चासत्र सुरूच राहिल्याने नितीशकुमार यांनी विधानसभेत प्रवेश केल्यानंतर या विषयावर झालेल्या चर्चेवर त्यांनी आक्षेप नोंदवला. विधानसभेत या विषयावर चर्चा होण्यासाठी अध्यक्षच खुली परवानगी देत असल्याचा त्यांचा एक प्रकारचा आक्षेप यावर आला आणि त्यांनी या पद्धतीने सभागृह चालवले जाऊ शकत नाही असे, खडे बोल खुद्द विधानसभा अध्यक्षांना सुनावले. मात्र संघाच्या मुशीत तयार झालेले विजय कुमार सिन्हा यांनी आपल्या पद्धतीने युक्तिवाद करत नितीश कुमार यांचा आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केल. नितीश कुमार यांनी विधानसभा अध्यक्ष अन्वर थेट संविधानाचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला. तर विधानसभा अध्यक्षांनी या विषयावर सभागृहात तीन दिवस खडाजंगी झालेली आहे अनेक वेळा सभागृह तहकूब करण्यात आले असल्यामुळे यासंदर्भात हा विषय पुढे लावून धरण्यात आल्याचे आपल्या युक्तिवादात सांगितले. परंतु या युक्तिवादाची मुख्यमंत्री नितीशकुमार हे सहमत दिसले नाहीत आणि प्रथमच देशाच्या एखाद्या विधानसभेत मुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले दिसले. वास्तविकता नितीश कुमार यांचा पक्ष भाजपबरोबर युतीत असल्याने मुख्यमंत्री पद नितीशकुमार यांना मिळाल्यानंतर सभागृहाचे अध्यक्षपद भाजपाकडे गेले आहे. येत असणारे अपक्षांचा आंतर संघर्ष देखील सुरू आहे मात्र तो सत्ता संचलनात थेट संवैधानिक पद आणि प्रशासन यांच्या दरम्यान च्या संघर्षातून पुढे येईल अशाप्रकारे अंदाज नव्हता. लखीसराय येथील पोलीस यंत्रणा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या बरोबर मतभेद नोंदवले आणि या मतभेदाचे मुख्य कारण म्हणजे बिहार राज्याच्या लखीसराय येथे विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले दुर्गापूजन च्या दरम्यान झालेला सांस्कृतिक संघर्ष हा महत्त्वाचा ठरला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर नितीशकुमार हे मुद्दा समाजवादी विचारांचे असल्यामुळे त्यांची राजकीय युती भाजप बरोबर झालेली असली तरीही आरएसएस शी त्यांचा सांस्कृतिक संघर्ष हा उभा राहीलच, त्यावर मात्र वाट मोकळी करता येणार नाही हे मात्र सत्य आहे

COMMENTS