Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव

अकोले  : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १३११ रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच सोयाबीन, गहू, मका व हरभरा या पिकांनाही समाधानकारक दर मिळाल्याचे चित्र आहे. बाजार समितीत कांद्याची एकूण २४०१ गोण्यांची आवक झाली. गोळा कांद्याला ११०१ ते १३११ रुपये दर मिळाला, तर नंबर १ कांद्याला ८०१ ते १००१ रुपये, नंबर २ ला ५०१ ते ७५१ रुपये, नंबर ३ ला ३०१ ते ५०१ रुपये दर मिळाला. गोल्टी कांद्याला ४०१ ते ७०१ रुपये, तर खाद कांद्याला १०० ते ३०१ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली. इतर पिकांमध्ये सोयाबीनला ५५०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल, मक्याला १५०० ते १८०० रुपये, गव्हाला २००० ते २३०० रुपये, तर हरभऱ्याला ४५०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. अकोले बाजार समितीमध्ये दर रविवार, मंगळवार व गुरुवार या दिवशी गोणी लिलावाद्वारे कांद्याची विक्री केली जाते. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर व प्र. सचिव राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू
माजी खा. विखे यांचा अकोलेकरांकडून सन्मान  
वीज कर्मचाऱ्यांचे ५ ऑगस्टचे उपोषण स्थगित
Akole Bazar Samiti Election

अकोले  : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १३११ रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच सोयाबीन, गहू, मका व हरभरा या पिकांनाही समाधानकारक दर मिळाल्याचे चित्र आहे.

बाजार समितीत कांद्याची एकूण २४०१ गोण्यांची आवक झाली. गोळा कांद्याला ११०१ ते १३११ रुपये दर मिळाला, तर नंबर १ कांद्याला ८०१ ते १००१ रुपये, नंबर २ ला ५०१ ते ७५१ रुपये, नंबर ३ ला ३०१ ते ५०१ रुपये दर मिळाला. गोल्टी कांद्याला ४०१ ते ७०१ रुपये, तर खाद कांद्याला १०० ते ३०१ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली.

इतर पिकांमध्ये सोयाबीनला ५५०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल, मक्याला १५०० ते १८०० रुपये, गव्हाला २००० ते २३०० रुपये, तर हरभऱ्याला ४५०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.

अकोले बाजार समितीमध्ये दर रविवार, मंगळवार व गुरुवार या दिवशी गोणी लिलावाद्वारे कांद्याची विक्री केली जाते. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर व प्र. सचिव राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

COMMENTS