Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर महाविद्यालयात चित्रपट निर्मिती कार्यशाळा उत्साहात

बेलापूर प्रतिनिधी ः आज-कालच्या युवांमध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा मोठ्या  प्रमाणात वाढू लागली आहे. परंतु; या क्षेत्रात दाखल कसे व्हा

दोन ठिकाणी धाडसी चोर्‍या
जिल्हा लोकल रिट कोर्ट सत्याग्रह जारी
जिल्ह्यातील पाच पाणी योजनांसाठीसाडे अठरा कोटीचा निधी मंजूर

बेलापूर प्रतिनिधी ः आज-कालच्या युवांमध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा मोठ्या  प्रमाणात वाढू लागली आहे. परंतु; या क्षेत्रात दाखल कसे व्हावे ? येथे काम कसे मिळते ? कोणाला किती मानधन असते ? या क्षेत्रातील शिक्षण कुठे मिळते? या क्षेत्रात होणार्‍या फसवणूकीपासून सावध कसे राहावे ? याविषयी नव्या युवा पिढीला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे कित्येक युवा कलाकारांची दिशाभूल होते. आपले भविष्य कला क्षेत्रात घडवण्यासाठी युवा कलाकारांनी योग्य मार्गदर्शकाचा शोध घेऊन या क्षेत्रात प्रत्येकाने सजग असले पाहिजे असे विचार लघुचित्रपट दिग्दर्शक मितेश ताके यांनी व्यक्त केले.
बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मराठी विभाग आयोजित ‘एक दिवसीय चित्रपट निर्मिती कार्यशाळेत’ प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती  म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राजेश खटोड हे उपस्थित  होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या. यावेळी व्यासपीठावर नाट्यनिर्मीतीक्षेत्रातील अशोक कर्णे, नवनाथ कर्डीले, कैलास सोनवणे तसेच प्रा. प्रकाश देशपांडे, प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. विलास गायकवाड, प्रा. डॉ. विठ्ठल लंगोटे, प्रा. डॉ. मनोज तेलोरे, प्रा. ओंकार मुळे, प्रा. स्वाती कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना दिग्दर्शक मितेश ताके यांनी चित्रपट निर्मिती वा आस्वाद प्रक्रिया यावर प्रकाश टाकला. यावे त्यांनी लघुपट लेखन, निरीक्षण, दिग्दर्शन, छायाचित्रण, चित्रांकन या चित्रपटाशी संबंधित तांत्रिक बाबींचा परिचय करून दिला. तसेच, ऑडिशन कसे द्यावे, अभिनय कसा करावा याविषयी सदर कार्यशाळेत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील एकूण 88 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेत चित्रपट निर्मीती प्रकियेचे बारकावे जाणून घेतले. खुल्या संवादात मितेश ताके यांनी चित्रपट निर्मितीबाबत सहभागी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच, उपस्थितांना लघुपटाचे प्रात्यक्षिक सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले. ग्रामीण भागातील मुलांना चित्रपट कलेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विठ्ठल लंगोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनोज तेलोरे यांनी केले. तर उपस्थिताचे आभार प्रा. बाबासाहेब पवार यांनी मानले. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत एकूण 88 विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.

COMMENTS