Homeताज्या बातम्या

माजी खा. विखे यांचा अकोलेकरांकडून सन्मान  

अकोले : अकोले तालुक्यातील विकासराव वाकचौरे यांची जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.सुजय विखे पाटील  यांचा सन्मान केला. लोणी येथील जनसेवा फाउंडेशन येथे अकोले तालुक्याचे आराध्य दैवत अगस्ती महाराज यांची प्रतिमा, टोपी, शाल देऊन विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.अकोले तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणारे सुगाव गावचे विकास वाकचौरे यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विकास वाकचौरे हे प्रवरा सहकारी दूध संस्थेचे माजी चेअरमन असून विखे पाटील यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सामाजिक राजकीय कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.माजी खा. सुजय विखे पाटील यांनी ही नियुक्ती करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी सन्मान करताना शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, भाजप सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, विखे पाटील फाउंडेशनचे राजाराम वाकचौरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल जगताप, भाजप महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे, सुगावचे माजी सरपंच दिलीपराव देशमुख, अमोल गोडसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पुन्हा दारू विक्री केल्यास एक लाखांचा दंडअवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राहुरी पोलिसांची कठोर कारवाई
खा. नीलेश लंके यांना डिस्चार्ज 
राशीनमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा७८० लिटर रसायन व दारू नष्ट

COMMENTS