Homeताज्या बातम्या

अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू

अकोले : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यानंतर ग्राहक पंचायत, महाराष्ट्रच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जिल्हा प्रशासनाने ३३५ टन युरिया खताचा बफर साठा खुला केला आहे. तालुक्यातील ५१ कृषी सेवा केंद्रांमार्फत या खताचे वितरण सुरू करण्यात आले असून, वितरण प्रक्रियेवर कृषी विभागाचे अधिकारी नियंत्रण ठेवून आहेत.अकोलेच्या आदिवासी भागात पावसामुळे पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र, याच काळात युरिया खताचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत महाराष्ट्रने तहसीलदार, जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार, ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच प्रसारमाध्यमांतूनही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने ३३५ टन युरिया खताचा बफर साठा उपलब्ध करून दिला. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच नियुक्त नियंत्रण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ५१ कृषी सेवा केंद्रांवर खताचे वितरण सुरू करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना खत वितरणाबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, तसेच आवश्यकतेनुसार ग्राहक पंचायतशीही संपर्क साधावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

डॉ. आंबेडकरांचे उपकार विसरू नयेत : चौरे 
अकोलेत ४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
तुळशीराम गभाले यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात
Online Urea Booking : ऑनलाईन युरिया बुकिंग करूनही खत मिळेना

COMMENTS