Homeताज्या बातम्यासंपादकीय

कर्मचारी कपातीचे संकट

जगभरात सध्या सुरू असलेली अनिश्‍चितता आणि मंदीचे मळभ यामुळे अनेक कंपन्या कर्मचार्‍यांची कपात करतांना दिसून येत आहे. नुकत्यात एका अहवालानुसार फक्त

लाचखोरीपासून संरक्षण नाहीच
महाविकास आघाडीतील वितंडवाद
निर्भयाची पुनरावृत्ती

जगभरात सध्या सुरू असलेली अनिश्‍चितता आणि मंदीचे मळभ यामुळे अनेक कंपन्या कर्मचार्‍यांची कपात करतांना दिसून येत आहे. नुकत्यात एका अहवालानुसार फक्त 6 महिन्यांतच साडेपाच लोकांना त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी कपातीचे नवे संकट उभे राहतांना दिसून येत आहे. एकीकडे मंदीचे मळभ आणि दुसरीकडे नफा कमी झाल्यामुळे कंपन्यांकडून खर्चामध्ये मोठी कपात करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणजे कर्मचारी कपात होय. मात्र यामुळे लाखो तरुणांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागतांना दिसून येत आहे. एका अहवालानुसार जगभरातील 760 कंपन्यांनी तब्बल 5 लाख 38 हजारांवर कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचारी कपात करण्याची वेळ आजच उद्भवलेली नाही. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेले जागतिक परिणाम यावर पडलेले दिसून येतात. मंदीचे संकट घोंघावण्यामागे अनेक बाबी कारणीभूत आहे. अमेरिकेसारख्या देशाने सुद्धा व्याजदरात मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर युक्रेन-रशिया युद्ध अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याचा पुरवठा कमी झाला आहे. इतकेच नाही तर, पुरवठा साखळीवरील साथीच्या रोगाचा परिणाम, चीनमधील कोरोना लॉकडाऊनमुळे कमी मागणी आणि कृषी क्षेत्राचा अंदाज चुकवणारे अत्यंत खराब हवामान यासारख्या कारणांमुळे जगाला विक्रमी महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचारी कपातीचे संकट एका देशात नसून, अमेरिका, ब्रिटनसह भारतात देखील दिसून येत आहे. त्यामुळे  गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची कपात करतांना दिसून येत आहे. अ‍ॅमेझॉन, ट्विटर, यासारख्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक मंदचे संकट गडद होतांना दिसून येत आहे. युरोपात आर्थिक संकटामुळे मंदीचे वारे वाहते आहे. त्याचा आपल्या निर्यातीवर वाईट परिणाम होत आहे. गेल्या दोन महिन्यात निर्यातीत सातत्याने घट होत आहे. आता आंतरराष्ट्रीय स्थितीचा आपल्यावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आर्थिक धोरण बदलत एकाच वेळी व्याजदर वाढवल्यामुळे, सन 2023 मध्ये जग जागतिक मंदीच्या दिशेने जाऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. साधारणतः दोन महिन्यापूर्वीच गुगल अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांनी नुकतीच 10 हजार कर्मचार्‍यांची कपात जाहीर केली आहे.दररोज एक किंवा दुसरी कंपनी कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय घेत आहे. एका खाजगी अहवालानुसार, ’भारतात तसेच जागतिक स्तरावर दररोज 3 हजार कर्मचारी नोकर्‍या गमावत आहेत. येत्या काळात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 166 टेक कंपन्यांनी 65 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढले आहे. मायक्रोसॉफ्टच्या 10 हजार कर्मचार्यांची छाटणी करण्यापूर्वी अ‍ॅमेझॉनने जागतिक स्तरावर 1000 भारतीय कर्मचार्‍यांसह एकूण 18,000 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. हा आकडा सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. भारतासारख्या देशात जर इतक्या लोकांना कामावरून कमी केले जात असेल तर, ब्रिटन, अमेरिकासारख्या देशाची परिस्थिती यापेक्षा बिकट असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरल्या होत्या, मानवी चुकामुळे पुन्हा एकदा जागतिक मंदीचे संकट तीव्र होतांना दिसू येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मोठी हानी होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर प्रत्येक देशाच्या वाढत्या महत्वाकांक्षा आणि इतर देश माझ्या अंकित असावे अशा सुप्त इच्छेमुळे मोठे नुकसान होतांना दिसून येत आहे. संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असल्यामुळे असले नको असलेल्या क्लृपत्या योजल्या जात आहे. त्यातून मानवी जगाचा भेसूर चेहरा दिसून येत आहे. 

COMMENTS