Homeताज्या बातम्या

कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति

रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका


बीड : शेतकरी लाखो रुपये बी – बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अतिवृष्टी, गारपीठ, चक्रीवादळ, ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ यात शेतकर्‍याचे यात शेतकर्‍याचे पिक उध्वस्त होते त्यातून पीक वाचले तर शेतकर्‍याच्या पिकाला भाव मिळत नाही अशा परिस्थितीत शेतकर्‍याने कर्ज फेडायचं कस?   या कर्जाच्या डोंगरपाई अनेक तरुण शेतकर्‍याचे संसार उध्वस्त झाले अशी भावना शेतकरी हक्क मोर्चाच्या राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केली.
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड जिल्ह्यातील गावागावात शेतकरी विरोधीफसव्या कर्जमाफी जीआरची होळी करण्यात येत आहे संत हरकूबाबा यांचे जन्म गाव अंथवान प्रिंपरी या गावापासून फसव्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाच्या विरोधात शेतकरी जनजागृती व कर्जमाफी शासन निर्णयाची होळी करण्याची मोहीम शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. नागपूर आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफी घोषणा केली आणि अनेक बँकांनी शेतकर्‍याच्या कर्ज कागदावर नवे जुने करून घेतले ज्या शेतकर्‍याचे फक्त कागदावर नवे जुने करून घेतले ते शेतकरी नियमित झाले ते थकित राहिले नाहीत असे शेतकरी कर्जमाफी पासून बँकाच्या चुकी मुळे वंचित राहणार आहेत तसेच मागील कर्जमाफी योजनेत कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍याला या योजनेत कर्ज माफी होणार नाही अशा मुख्य अटी शर्ती मुळे शेतकर्‍याला कर्जमाफी योजनेचा फायदा होणार नाही हि कर्जमाफी फसवी आहे म्हणून शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गावा-गावात जाऊन शेतकरी जनजागृती व फसव्या कर्जमाफी चा निषेध शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे असे शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे, अशोक येडे, प्रा ज्ञानेश्वर राऊत,मधुकर शिंदे, जालिंदर शिंदे, दिलीप शिंदे,वसंत शिंदे, बाबासाहेब प्रभाळे, प्रकाश गिरी जालिंदर शिंदे, सातवाजी शिंदे, अनंत प्रभाळे, रमेश प्रभाळे, शदेक शेख, नसीर शेख, जावेद पठाण, राजेंद्र प्रभाळे,नामदेव वाघमारे, बाळू गिरी,पवन शिंदे, प्रसाद गिरी, धुराजी प्रभाळे, विक्रम पुरभे, अन्सार सय्यद, तेजस शिंदे, बापूसहेब, जीवन शिंदे, दत्ता गिरी, भीमराव शिंदे, नासिर शेख, आदी शेतकरी कर्जमाफी जागृती वेळी उपस्थित होते.

COMMENTS