Homeताज्या बातम्या

ख्यातनाम समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी यांना प्रतिष्ठित ‘शेर-ए-हिंद मौलाना बरकतुल्लाह स्मृती राष्ट्रसेवा व समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

बीड जिल्ह्यातील ख्यातनाम समाजसेवक तथा ‘एकता युवा मंच’चे संस्थापक जावेद भैय्या कुरेशी यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘शेर-ए-हिंद मौलाना बरकतुल्लाह स्मृती

आदर्शगाव वंजारवाडीत गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा उत्साहात सत्कार
बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह
बीडच्या विकास प्रश्नी डॉ.योगेश क्षीरसागरांनी घेतली पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट-अग्निशामक दलासाठी 2 वाहने मिळणार-रस्ते, शेतीसह प्रलंबित कामांवरही चर्चा



बीड जिल्ह्यातील ख्यातनाम समाजसेवक तथा ‘एकता युवा मंच’चे संस्थापक जावेद भैय्या कुरेशी यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘शेर-ए-हिंद मौलाना बरकतुल्लाह स्मृती राष्ट्रसेवा व समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सर्वधर्मसमभावाची जोपासना आणि तळागाळातील जनसेवेबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
‘साप्ताहिक युवा लोकमित्र’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात येत असून, समाजकारण क्षेत्रातील विशेष कार्याची दखल घेत जावेद भैय्या कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे गदर पार्टीचे संस्थापक आणि भारताच्या पहिल्या हंगामी सरकारचे पंतप्रधान ‘शेर-ए-हिंद’ मौलाना बरकतुल्लाह भोपाली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार प्रदान केला जातो. समाजात सलोखा, बंधुभाव आणि मानवतेची भावना रुजविण्यासाठी जावेद भैय्या कुरेशी यांनी केलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. जावेद भैय्या कुरेशी यांनी ‘एकता युवा मंच’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, महिलांना शिलाई मशीनचे वितरण, गरजू कुटुंबांना किराणा किट उपलब्ध करून देणे, रुग्णसेवा, अन्नदान तसेच श्रमिक महिलांना छत्र्यांचे वाटप यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून विविध समाजघटकांमध्ये संवाद आणि ऐक्य निर्माण करण्यासाठीही कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये आदराची भावना निर्माण झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बीड येथील ढरक्ष झरश्ररलश येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी महासंघ, शेतकरी संघटना, ‘एकता युवा मंच’चे कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून जावेद भैय्या कुरेशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS