Homeव्हिडीओ

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने

https://youtu.be/EA95nLxW_jc कर्जमाफीच्या शासनादेशामध्ये मोठ्या प्रमाणात अटी शर्ती लावल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने  कांदा उत्पादक आक्रमक  
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन

कर्जमाफीच्या शासनादेशामध्ये मोठ्या प्रमाणात अटी शर्ती लावल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत. 2019 चा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना 2026 कर्जमाफीमध्ये केवळ पन्नास हजार रुपयांच्या मर्यादित लाभ देण्यात येणार असून त्यातही त्यांना त्यांच्यावरील उर्वरित कर्ज पूर्णपणे भरण्याची अट टाकण्यात आली आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा किमान चार वेळा कर्ज भरले असण्याची अट टाकण्यात आलेली आहे. अशा शेतकऱ्यांना सुद्धा केवळ पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत. सरकारने या अटी शर्ती तातडीने रद्द कराव्या व शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करण्याच्या आश्वासन पाळावे अशी मागणी करत किसान सभेने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. चौका चौकात शासनादेश जाळून तसेच निदर्शने करून आंदोलन तीव्र केले जात आहे.अहिल्यानगर येथील अकोले तालुक्यामध्ये निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सहकारी सोसायटयांचे चेअरमन व सचिवांना निवेदने देऊन त्यांच्या मार्फत आपले म्हणणे राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची मोहीम किसान सभेने सुरू केली आहे.

COMMENTS