महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडियाच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश आप्पा आहेर यांची नियुक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडियाच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश आप्पा आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती दि. 28 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गेवराई येथील कार्यालयात डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अनिल दादा आगुंडे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे गेवराई तालुका अध्यक्ष अंकुश आतकरे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल दादा आगुंडे, तालुका अध्यक्ष अंकुश आतकरे, पत्रकार शेख खाजा, सामाजिक कार्यकर्ते खदिर मामू बागवान, गणेश गोरे तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सुरेश आप्पा आहेर यांनी मागील काही महिन्यांत पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गेवराई तालुक्यात डिजिटल मीडियाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

COMMENTS